यशवंत एक प्रेरणास्रोत

गाव खेड्यातील लाखो गरिबांना दृष्टी देणारा डोळ्यांचा डॉक्टर

Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

या डॉक्टरला महिन्याला ३० रुपये मजुरीसाठी रोज खांद्यावर कावड घेऊन २५ खेपा असे ५० घागरी पाणी आणावे लागले.या डॉक्टरला MBBS ला ॲडमिशन घेतल्यावर वसतिगृहातील ७ मुलांचा रोज स्वयंपाक करावा लागला. का? तर जेवण फुकट मिळायचे म्हणून..

अथक परिश्रम करून तो एक नेत्रतज्ज्ञ बनला…

१९९१ साल उजाडलं या डॉक्टरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या डॉक्टरांनी एका वर्षांतच तुम्ही मरणार असे भाकीत केलं आईनं अंजनाबाईनं स्वत:ची किडनी दिली. पुनर्जन्म मिळाला. आणि पुढील आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी व्यतीत करायचं हा निर्णय त्याने घेतला आजवर या अवलिया डॉक्टरने सव्वा कोटींवर रुग्णांची तपासणी केली आहे. तर, त्यापैकी दीड लाख वृद्धांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या. जन्मत: अंध असलेल्या १० हजार रुग्णांच्या आयुष्यात नवचैतन्याचे रंग भरण्याचं काम केलं. एक लाख शस्त्रक्रिया केल्याबद्दल या डॉक्टरचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला असा हा अवलिया डॉक्टर म्हणजे डॉ. तात्याराव लहाने.

Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांचे काम चालत असले तरी विविध शिबीरांच्या निमित्ताने त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. आनंदवन येथे डॉ. बाबा आमटे यांच्या पुढाकाराने झालेल्या शिबीरातून त्यांनी दुर्गम भागातील अनेक मोतीबिंदू झालेल्या आदिवासी बांधवांनाही दृष्टी दिली.

तळातील कष्टकरी तसेच हायप्रोफाईल व्यक्तींवरही त्यांनी यशस्वी उपचार केले. बारामतीतील शिबीरात एक एडसग्रस्त व्यक्ती होती, तिच्यावर कोणीच उपचार करायला तयार नव्हते, त्या व्यक्तीची खाजगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करुन घेण्याची परिस्थितीही नव्हती. लहाने यांनी त्याला तपासून लगेचच शिबीरात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रीया केली, त्याला दिसू लागले.

Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

६६७ वैद्यकीय शिबिरांमधून तीस लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार आणि १८० हून अधिक शिबिरांमधून एक लाख ३० हजार रुग्णांना दृष्टी देणाऱ्या शस्त्रक्रिया एवढे अफाट काम त्यांनी केले. लातूरमधील मकेगावसारख्या लहानशा खेडयातून मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे सहसंचालक या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सारं काही सांगणारा आहे. नुकतेच डॉ. लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर निवृत्त झाले.

प्रतिकूल परिस्थितीतही आपले ध्येय गाठणारा एक ध्येयवादी म्हणून डॉ. लहानेंचं नाव घेता येईल. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button