अनुक्रमणिका
शिकणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनात हवे ते प्राप्त करुन घेण्याची कला म्हणजे त्या गोष्टीचे शिक्षण होय. ज्याला पोहता येत नाही त्याने पोहण्याचे कसब आत्मसात करुन घेतले म्हणजे पोहण्याचे शिक्षण घेतले असा त्याचा अर्थ होतो. ही लेखमालिका खास करुन शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना उपयुक्त आहेच. त्याचबरोबर ज्यांना आत्मविश्वास हवा आहे, जीवनात अनेक प्रकारची भीती आहे.
स्वतःच्या क्षमतावर असणारा विश्वास अधिक दृढ करायचा आहे, न्यूनगंडावर मात करायची आहे, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढवायची आहे, विसरभोळेपणा विसरायचा आहे, रागावर नियंत्रण मिळवायचे आहे, जीवनात संयम आणायचा आहे, जोखीम घ्यायची क्षमता वाढवायची आहे व व्यक्तीमत्त्व प्रभावशाली बनवायचे आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी ही लेखमालिका महत्त्वाची आहे.
अर्थात या लेखमालिकेत असे काही कानमंत्र दिले आहेत. त्यामुळे मला इंग्रजी येत नाही, माझे पुरेसे शिक्षण नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या कुटुंबातील लोक मला विरोध करतात यासारखी हजारो कारणे देणारी आपली मानसिकता बदलेल. त्याऐवजी माझ्याकडे काहीही नसले तरी मी सर्वकाही करु शकतो. मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असले तरी सुध्दा ऑक्सफर्ड केंब्रिजच्या विद्यार्थ्याइतक्या क्षमता माझ्यात आहेत. त्या जागे करण्याची कला मला सहज साध्य आहे.
इंटरनॅशनल शाळा, सीबीएसई, तसेच पब्लिक स्कूल (अर्थात भरपूर पैसे भरुन जिथे शिक्षण विकत घेतले जाते व दर्जेदार शिक्षणाचा फुगा फुगवला जातो अशा खाजगी शाळा) मधून (या प्रकारच्या संस्थाना आपण अ गट म्हणू या.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जिल्हा परिषद शाळा, मुन्सिपालिटीच्या शाळा, सरकारी विद्यालये, बोर्डिंग स्कूल, विनानुदानित शाळांमध्ये (या प्रकारच्या संस्थाना आपण ब गट म्हणू या.) शिक्षण घेणारे विद्यार्थी कुठेच कमी नाहीत याची जाणीव दोन्ही वर्गाला होईल. त्यातून विकासाचा मार्ग पुढे जात राहील. अ गटात ब गटापेक्षा असणारी साधने नक्कीच प्रभावशाली आहेत. मात्र त्या साधनांना वापरण्यासाठी त्याचा योग्य परिणाम साधण्यासाठी करावी लागणारी साधना करण्याची क्षमता दोन्ही गटाकडे सारखीच आहे. या साधनेचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे.
भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक
१. शिक्षणाचे महत्त्व
२. कल ओळखण्याची कला
३. शिकण्याच्या पध्दती
४. ऐकून शिकण्याचे महत्त्व
५. बघून शिकण्याचे महत्त्व
६. अनुभवातून शिकण्याचे महत्त्व
भाग २ – शिक्षणाच्या पुढील टप्प्यावर
७. आकलन – वाचनाची गरज
१०. लेखन एक देणगी
११. पाठांतराला फाटा देऊन लक्षात ठेवण्याची कला
१२. योग्य वेळी योग्य गोष्टी आठवण्याची पध्दती
१३. जगताना चालता फिरता शिकण्याचे तंत्र
१४. मुल्ये जोपासताना – मुल्यांचे मूल्य
१५. शिक्षणातून करिअरकडे जाताना
भाग ३ – व्यावहारिक जगात शिक्षणाची सांगड
१४. कविता जीवन मधूर करतात
१५. गणिताने व्यवहार सुलभ होतात
१६. गणिताची भीती घालवण्याची सोपी पध्दत
१७. अवघड सुत्रांना मित्र बनवू या
१८. इतिहासातील सनावळ्या झाल्या
१९. चित्रकलेने आयुष्यात भरले रंग
२०. खेळामुळे जीवन बनते आनंदी
२१. भूगोल म्हणजे सहलीची मजा
२२. मराठी-हिंदी-इंग्रजी भाषा म्हणजे ताई-माई-अक्का
२३. नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र म्हणजे मैत्रीचे धडे
२४. शब्दकोडी म्हणजे जीवनातला विरंगुळा
२५. चर्चेतून शिकू या सारे काही
२६. बाजारातील घटकांचे गणित
२७. उद्योगशिक्षणासाठी कार्यानुभव
२८. शिक्षणातील गमती (मजेशीर अनुभव)
२९. अनेक विषय म्हणजे ताण नाही तर मजा
भाग ४ – परिक्षा म्हणजे महोत्सव
३०. चुटकीसरशी घालवू परिक्षेची भीती
३१. परिक्षेची वाट पाहताना
३२. रोजच पाहिजे शाळा – शिक्षणाची गोडी
३३. विषयाची भीती नको – गंमत जाणून घेऊ
३४. मुलाखती म्हणजे गप्पांचा अड्डा
३५. भाषण माझ्या आवडीचे
३६. स्टेज गाजवायचा – रंगमंचावर रंग भरताना
३७. चला शिक्षकमित्र बनू या
भाग ५ – व्यक्तिमत्व विकास : सारे काही शिकताना
३८. आत्मविश्वासाला बाहेर काढू, संकटांना भिडू
३९. चार भिंतीतल्या शिक्षणाच्या मर्यादा जुगारताना
४०. नवीन भाषा – संकट नव्हे संधी
४१. आनंदाने समाजात वावरताना
४२. भूतकाळ भूतकाळात जमा
४३. वर्तमानातून भविष्याकडे
४४. न्यूनगंड, भीती, नकारात्मकता हद्दपार
४५. जोखीम नव्हे पराक्रमाचे मैदान
४६. पैसे मिळवण्याची कला
४७. दानातून मिळणारा आनंद
४८. रागावर मात – जीवन आनंदात
४९. जीवनसंगीताचे सूर जुळवताना
५०. नात्यांचे बंध जोडताना
उद्यापासून रोज सकाळी दहा वाजता एक लेख प्रकाशित होईल. शिक्षणाच्या निरंतर प्रवासासाठी शुभ यात्रा.