‘LinkedIn’ ची सुरुवात कशी झाली?
जॉब सर्च असो किंवा प्रोफेशनल जगाशी संबंध, कनेक्शन्स बनवणे असो किंवा स्वत:चे प्रोफेशनल विश्वातील यश या सर्वांसाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणजे ‘LinkedIn.’ हा प्लॅटफॉर्म वापरण्याचे हे सोडून आणखीही फायदे आहेत. जसे की आपल्या जॉब स्किल्ससाठी फायदेशीर कोर्सेस करणे, स्वत:च्या अनुभवांविषयी किंवा इतर महत्त्वाच्या विषयांविषयी लिहून ते तिथे शेअर करणे आणि एकूणच तुम्ही कौशल्यपूर्ण आणि जॉबसाठी कसे पात्र आहात हे कृतींमधून सिद्ध करणे.
हा प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतरांशी तुलना केल्यास वेगळा आढळून येतो. काळाच्या ओघात याचे महत्त्व वाढतच चालले आहे. काय आहे यामागची स्टोरी आणि कशी झाली याची सुरुवात हेच जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून.
‘LinkedIn’ ची सुरुवात –
‘LinkedIn’ अधिकृतपणे 5 मे 2003 ला लाँच करण्यात आले, पण त्याची खरी सुरुवात 2002 मध्येच झाली होती. रीड हॉफमॅन यांनी आपल्या लिविंग रूम मध्ये LinkedIn ची सुरुवात केली. हॉफमॅन यांच्यासोबत त्यांचे पे-पल आणि सोशल नेट कंपनीतील सहकारी होते. त्यांचा हा प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा मूळ उद्देश प्रोफेशनल विश्वातील लोकांची एकमेकांशी ओळख व्हावी, या माध्यमातून ते जोडले जावेत आणि त्यांचा एकमेकांना फायदा व्हावा असा होता.
LinkedIn ची सुरुवात केल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांच्यासोबत 4,500 सदस्य जोडले गेले. 2005 ला त्यांनी जॉब्स आणि सबस्क्रीप्शन हा पर्याय उपलब्ध केला. यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. 2006 मध्ये ‘People you may know’ हे फिचर वापरात आणले.
चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर लिंक्डइनला हळूहळू ओळख मिळून प्रसिद्धी वाढू लागली. 2008 मध्ये लिंक्डइन स्पेन. यु.के आणि फ्रान्समध्ये वापरले जाऊ लागले. त्याच वर्षी त्यांच्या युजर्सच्या आकड्याने उच्चांक गाठला आणि तो 15 मिलियन पर्यंत (१.५ कोटींपर्यंत) पोहोचला. 2011 येईपर्यंत युजर्सचा हा आलेख वेगाने वाढतच गेला आणि कंपनीच्या युझर्सची संख्या 15 पासून 100 मिलियन (१० कोटींपर्यंत) पोहोचली. 2013 मध्ये LinkedIn सुरु करून 10 वर्षे पूर्ण झाली. युजर्सची होत जाणारी वाढ हा योग्य फीचर्स आणि वेळोवेळी केलेल्या बदलांचा परिणाम होता. त्यानंतर त्यांनी नुकतेच ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आणि चांगल्या जॉब च्या शोधात असणारे तरूण यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्या यशात आणखी भर पडत गेली. 2016 मध्ये मायक्रोसॉफ्ट ने LinkedIn $26 बिलियन ला विकत घेतले. 2017 मध्ये LinkedIn ने डेस्क2 साठी नवीन फिचर सुरु केले आणि 2019 मध्ये आणखी काही फीचर्सची वाढ करून LinkedIn ने स्व त:ला परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला.
LinkedIn ची सध्याची परिस्थिती
LinkedIn च्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्मची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. हे जागतिक स्तरावर युझर्सच्या बाबतीत अव्वल आहे, त्यातले बहुतेक व्यावसायिक आहेत. आणि प्रत्येक आठवड्यात दहा लाखांहून अधिक नवीन वापरकर्ते सामील होत आहेत.
Linkedin बद्दल महत्त्वाच्या बाबी
70% पेक्षा जास्त युजर्स यूएस बाहेरील आहेत.
90 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते वरिष्ठ-स्तरीय आहेत आणि 63 दशलक्ष निर्णय घेण्याच्या पदांवर आहेत.
50% पेक्षा जास्त वापरकर्ते महाविद्यालयीन पदवीधारक किंवा सुशिक्षित तरूण आहेत.
24% युजर्स 18-24 वर्षे वयोगटातील लोक आहेत.
LinkedIn ची सुरुवात कठीण होती परंतु वरचेवर फीचर्स मध्ये बदल करून त्यांनी आपले महत्त्व वाढवले. नवीन संधींचा आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करता येणाऱ्या काळात LINKEDIN चे महत्त्व वाढत जाणार आहे.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.