व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिके अंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील… करायची सुरवात?
एक बिल्डर आमच्याकडे आले. त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये ६० फ्लॅट विक्रीविना पडून होते. त्याचा खप लवकर व्हावा म्हणून त्यांनी विविध ठिकाणी केवळ एक महिन्यात १० ते १२ लाख रुपये खर्च केले; पण फ्लॅट काय विकले गेले नाहीत. काय चूक झाली त्यांची? म्हणतात ना, तूप खाल्यावर रूप येत नाही किंवा आज लावलेल्या झाडाला उद्या लगेच फळे लागत नाहीत. किंवा आज मेकअप करून उद्या कोण हिरॉईन होणार नाही, दिल्लीत यूपीएससीचा क्लास लावला म्हणून कोणी आयएएस ऑफिसर होणार नाही. जगात कोणताही रिझल्ट किंवा यश असे सहजासहजी मिळत नाही. बिझनेसचेही तसेच आहे, फक्त पैसा खर्च केल्यानेच काही होत नाही. मार्केटिंगची व ब्रँडिंगची नियोजनबद्ध प्रक्रिया पार पाडावी लागते. त्या त्या गोष्टीला कालावधी घ्यावा लागतो.
ब्रँडिंग ही एक ‘स्लो’ प्रोसेस आहे, ह्या पद्धतीद्वारे तुम्ही हळूहळू ग्राहकांच्या मनात तुमच्या प्रॉडक्टच्या नावाबद्दल जागा तयार करता. ग्राहकांना प्रथम तुमच्याबद्दल माहिती व्हायला सुरु होते, परत फोन, भेटी, ईमेलच्या माध्यमातून संवाद सुरू होतो. त्यानंतर अधिक सखोल चर्चा होऊन पुढे व्यवहारात रूपांतर होते. रातोरात जाहिरातबाजी करून कोणताही ब्रॅंड, प्रॉडक्ट किंवा व्यक्ती प्रसिध्द होऊ शकत नाही. तसे केल्यास तो एक पैसा वाया घालविण्याचा खेळ होऊन बसतो. मानसशास्त्रानुसार एखादा व्यवसाय ग्राहकांच्या मनात चांगले घर करून बसण्यासाठी किमान ३ वर्षे लागतात व तुमचा एक कायमचा ग्राहक वर्ग तयार होतो.
आज १० किलो तूप प्यायल्यावर उद्याच्या उद्या कोण पैलवान होणार नाही. उलट आहे ती तब्येतही ढासळेल. पण त्याऐवजी त्याने रोज ५० ग्रॅम तूप प्यायले व १ तास व्यायाम केला तर त्याची तब्येत नक्कीच सुधारून तो पैलवान होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पुढे जाऊन तो रोज १०० ग्रॅम, २०० ग्रॅम असे तूप पिणे वाढवू शकतो. त्याचबरोबर त्याला व्यायामही वाढवावा लागेल. तसेच कोणत्याही व्यवसायात अचानक जाहिरातबाजी करून फायदा होत नसतो. तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला शास्त्रीय पध्दतीने ब्रँडिंग व मार्केटिंगचे प्लॅनिंग करून राबवावे लागते. फ्लॅट खपत नाहीत म्हणून १० लाख जाहिरातींवर घालविले म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे. अगोदरच खप नाही, त्यात १० लाख वाया! व्यवसायात कोणत्याही नियोजनाशिवाय खर्च केलेला पैसा वाया जाऊन नुकसानीस सामोरे जावे लागते. आज जाहिरात केली आणि उद्या प्रॉडक्ट खपला एवढं सोपं नाही.
बिझनेसला इतकं हलक्यात घेवू नका. तुम्ही तुमच्या व्यवसायात ब्रॅण्डिंगची काळजी घेताय ना…? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडल्यास व्हिडीओ लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.
आणखी वाचा
- जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम
- कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान
- जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील
- व्यावसायिकांनी कर्ज कसे हाताळावे
- मुलांना यशस्वी व उद्योजक कसे बनवाल?