उद्योजकता विजडमलेखमालिका

जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा  

गाडी वेगाने कशामुळे धावते? असा प्रश्न एका व्याख्यानात श्रोत्यांना केला, तेव्हा अनेकांनी इंजिन, पेट्रोल, ॲक्सलरेटर, चाक अशी उत्तरे दिली. ही उत्तरं बरोबर आहेत. परंतु मित्रहो थोडा वेळ विचार करा, जर समजा गाडीला ब्रेकच नसता, तर तुम्हाला गाडी खूप लांब चालविता आली असती का? तर नाही. वेगावर नियंत्रण ठेवता येण्यामुळेच जगातील कोणतीही गोष्ट किंवा वाहन चालते. ज्या गोष्टीला थांबण्यासाठी ब्रेक नाही अशा गोष्टी वादळाप्रमाणे सुसाट जातात व धडकून नष्ट होतात. जशी आकाशातून पडलेली उल्का किंवा नियंत्रण हरवून बसलेलं एखादं विमान. गोष्टी थांबल्या आणि योग्य ठिकाणी थांबल्या तर फायद्याच्या असतात.

व्यवसाय करत असताना कधी किती वेगाने जायचं, कधी ब्रेक मारून थांबायचं हे कळायला हवं. सीसीडी ब्रॅंड आपल्या कॅफेच्या शाखा धडाधड उघडत गेला. पण वेगाने पुढे जायच्या नशेत आपल्या हातून काय चुका होत आहेत याचा अंदाज न आल्याने एक दिवस याच करोडोंची उलाढाल करणाऱ्या ब्रॅंडच्या मालकाला आत्महत्या करायची वेळ आली. थांबल्याने, हळूहळू चालल्याने फरक पडत नाही. फक्त कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि किती वेळ थांबायचं याचं विजडम जवळ हवं…  

तुम्ही असा ब्रेक घेता का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

हा लेख विडीयो मध्ये पहा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button