हल्ली एका क्लिकवरुन आपण लाखो रुपयांची उलाढाल करू शकतो. १०-१५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. बँकेत दिवसभर रांगेत उभं राहूनही पैसे मिळतीलच याची खात्री नव्हती. पण आत्ता सगळं कसं सोयीस्कर झालंय.
हल्ली क्षणार्धात एका अकाऊंटवरचे पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. पण हे ऑनलाइन पेमेंट करायचं म्हणजे अनेकांना जरा risky च काम वाटतं. हा म्हणजे भीती वाटणं सहाजिकच आहे म्हणा, कारण बऱ्याच ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून फ्रॉडच्या फसवणुकीच्या बातम्या कानावर पडत असतात.
मग अशावेळी आपण काय केलं पाहिजे. चला तर पाहूया…
बऱ्याचदा आपण एखाद्या कमी विश्वासार्ह किंवा फेक लिंकवर जाऊन वस्तू खरेदी करतो. अरे हा ड्रेस किती सुंदर आहे आणि स्वस्त पण आहे, चला घेऊन टाकू असं म्हणून लगेच ते प्रॉडक्ट आपण खरेदी करतो. आणि यात महिलावर्गाचे प्रमाण थोडे जास्तच असते. मैत्रिणींनो कपड्यांच्या दुकानात गेलात तरी तुम्ही पारखून कपडे विकत घेता, मग ऑनलाइन कपडे घेताना मात्र कशा फसता बरं? कोणतीही वस्तू ऑनलाइन विकत घेताना जिथून तुम्ही ऑर्डर करणार आहात त्या साईटची आधी माहिती घ्या. तिथले reviews चेक करा. फेसबुकला कोणीतरी काहीतरी टाकलंय, केवळ insta वर फोटो छान दिसतायत म्हणून ऑर्डर करू नका. त्यांची verified website आहे का ते पहा, त्यांचं app आहे का ते पहा. त्यांच्याकडे cash on delivery हा ऑप्शन आहे का ते पहा. अर्धवट महिती शिवाय कधीच, काहीच बूक करू नका आणि payment तर अजिबातच करू नका.
दूसरा मुद्दा म्हणजे
बऱ्याचदा आपल्या फोन मधील नेट संपल्यावर आपण दुसऱ्यांचं वायफाय घेतो. पण हे असं दुसऱ्यांचं वायफाय वापरण्याच्या नादात कधी तुमचा फोन हॅक होईल सांगता सुद्धा यायचं नाही. दुसऱ्याचं वायफाय किंवा सार्वजनिक कॉम्प्युटर वापरल्यामुळे तुमचे डॉक्युमेंट आणि पासवर्ड चोरले जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर स्वतःची जी काही personal कामं असतील ती फक्त स्वतःच्या वायफाय आणि कॉम्प्युटरवरच करावीत.
कार्ड सेव्ह करू नका:
ऑनलाईन खरेदी करताना अनेकजण डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात. याचं मुख्य कारण म्हणजे कार्डवर मिळणाऱ्या विविध ऑफर्स. एखादे प्रॉडक्ट खरेदी करताना Save card for future किंवा save card details अशा प्रकारचे ऑप्शन असणारी टिकमार्क काढून टाकायची विसरतात किंवा next order च्यावेळी कार्डचे डिटेल्स भरायचा त्रास वाचण्यासाठी save करतात. परंतु हे टाळले पाहिजे, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. याचबरोबर ब्राउझरमध्ये असणारी ऑटोफिल सुविधा देखील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत बंद केली पाहिजे. यामुळे कदाचित सगळी माहिती भरण्याचे कष्ट करावे लागतील, परंतु ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होतील.
अनेकदा बँक, क्रेडिट कार्ड किंवा इन्शुरन्स कंपनीकडून महत्वाचे मेल येतात. त्यामध्ये एखादी ऑफर किंवा केवायसी संबंधित माहिती विचारली जाते. संबंधित विषयाच्या अधिक माहितीसाठी किंवा ऑफर मिळविण्यासाठी त्यामध्ये एक लिंक दिली जाते. सवलत देणाऱ्या जाहिरातींकडे आपण लगेच attract होतो. पण लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान! हा फिशिंगचा प्रकार असू शकतो. हा मेल फसवा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही मेलमध्ये आलेली लिंक क्लिक करण्यापूर्वी आलेला मेल अधिकृत कंपनीकडून आल्याची खात्री करून घ्या किंवा आलेल्या offer संदर्भात आपल्या बँकेकडे चौकशी करा.
क्यूआर कोड स्कॅन करतानाही आवश्यक ती काळजी घ्या. खात्रीशीर दुकानांमध्येच क्यूआर कोड स्कॅन करा. काहीवेळेस असे देखील घडते की, क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुमच्या बँक खात्याची संपूर्ण history हॅकरकडे जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व संशयित वाटणारा क्यूआर कोड अजिबात स्कॅन करू नका. त्यामुळे एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रक्कमही तुमच्या अकाऊंट मधून कट होऊ शकते.
तर मग यापुढे ऑनलाईन पेमेंट करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि निश्चिंत राहा.