स्टार्टअपस्टार्टअप विश्व

Pivot स्टार्टअपसाठी : यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची पायरी

Pivot – सोमवारची सकाळ, दरवेळेस प्रमाणे सुरेशला याही सोमवारी एका महत्त्वाच्या Meeting साठी जायला उशीर झालेला आहे. सुरेश गाडी काढतो आणि रोजच्या रस्त्याने निघतो, पण जाता जाता अलीकडेच त्याच्या लक्षात येतं की Traffic मुळे आपल्याला पोहचायला खूप वेळ लागेल. काय करावं काही सुचत नसतं. Traffic मध्ये थांबलो तर उशीर होणार हे फिक्स आणि उशिरा पोहचलो, तर डील ब्रेक होणार हे फिक्स! अशा द्विधा मनःस्थितीत असताना सुरेशला अचानक लक्षात येतं की अलीकडूनच एक छोटा रस्ता आहे. ठरवलेल्या रस्त्याने जाण्यापेक्षा इकडून गेलं तर ते जास्त फायद्याचं ठरेल. सुरेश लगेच गाडीचा Reverse Gear टाकतो, शक्य होईल तितक्या लवकर गंतव्य ठिकाणी पोहचतो, Meeting होते आणि शेवटी डील पक्की होते.

स्टार्टअप विश्वच्या लेखात हे काय? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. जरा धीर धरा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हळूहळू मिळतीलच. मित्रांनो, व्यवसाय आणि आपलं रोजचं जगणं काही वेगवेगळं नाही हे आत्तापर्यंत आपण अनेक लेखांत वेगवेगळ्या उदाहरणांसोबत पाहिलं. आता वरच्या उदाहरणाप्रमाणे सुरेशला एका महत्त्वाच्या कामाच्या वेळेस नेमका अडथळा आला. आपलं काम आता होईल का? या चिंतेत असतानाच त्याने ठरवलेल्या रोजच्या मार्गाने जाण्याऐवजी एक वेगळा मार्ग निवडला आणि शेवटी तो ते काम करण्यात यशस्वी झाला. सुरेशच्या जीवनात जे काही घडलं तेच आता आपण एका स्टार्टअप फाउंडरच्या संदर्भात पाहूया.

एक फाउंडर अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर आपला स्टार्टअप उभा करतो. त्यासाठी लागणारे पैसे, टीम हे सगळं तो व्यवस्थितरीत्या Manage करतो. सगळं होतं कामाला सुरुवात होते, पण पाहिजे तेवढा Profit त्याला त्यातून मिळत नाही. खूप विचार करून शेवटी तो ठरवतो की स्टार्टअपची ही आयडिया Scrap करून आपण एका नव्या कल्पनेवर काम सुरु करूया. ठरवलेल्या गोष्टीतला तोटा लक्षात घेऊन ती गोष्ट सोडून नफा मिळवून देणाऱ्या गोष्टीवर काम सुरु करण्यालाच स्टार्टअप विश्वात Pivot असं म्हणतात.   

Pivot हे कोणत्याही बाबतीत असू शकतं म्हणजे दरवेळेस असं नाही की एखादी पूर्ण कल्पनाच बदलणं म्हणजे Pivot करणं. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते कोणकोणते ते पण आपण जरा पाहूया.

Pivot चे प्रकार

Eric Ries या अमेरिकन उद्योजकाने Lean Startup या पुस्तकात Pivot चे दहा प्रकार सांगितले आहेत.

Zoom-in : समजा तुमचं एक Product आहे. त्या Product मध्ये खूप सारे Features आहेत, पण User Reports नुसार तुमच्या लक्षात आलं की, यापैकी एकाच Feature चा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मग तुम्ही ठरवता की सगळे Feature ठेवण्यापेक्षा फक्त एकाच Feature वर Focus करूया आणि तेच तुमचं Final Product बनतं. याच Process ला Zoom-in Pivot असं म्हणतात.

Zoom-out : Zoom-In Pivot च्या अगदी विरुद्ध Process म्हणजे Zoom-Out Pivot. यात सुरुवातीला तुमच्या Product मध्ये एकच Feature असतं, पण हळू हळू तुम्ही त्यात वेगेवगळे Features Add करता आणि तेच तुमचं Main Product बनतं.

Customer segment pivot : तुमचं Product हे त्या लोकांना आवडतंय ज्यांना तुम्ही Target केलेलंच नाही, मग अशा वेळेस करणार काय? तर तुमचा जो Target Audience आहे तो बदलणं गरजेचं आहे म्हणजे Customer Segment Pivot करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा Profit वाढेल.

Customer Need Pivot : तुम्ही बनवलेलं तुमचं Dream Product हे Customer ला आवडेलच याची काही Gurantee नसते. आणि Customer ला पाहिजे असलेल्या गोष्टी तुम्ही Provide करत नसाल, तर Profit चा आणि तुमचा कधी संबंधच येणार नाही. मग अशावेळी काय करणार तर Customer च्या गरजेनुसार तुम्ही तुमचं Product बदलू शकता म्हणजेच Customer Need Pivot करू शकता.

Platform Pivot : App ला वेबसाईटमध्ये Convert करणं किंवा याउलट वेबसाईटला App मध्ये Convert करणं या गोष्टी त्यामध्ये येतात. यामध्ये तुम्ही तुमच्या Product चा Platform च Change करत असता. 

या महत्त्वाच्या पाच प्रकारांसोबत Pivot चे आणखी काही प्रकार आहेत. जसं की Business Architecture , Value Capture, Engine of Growth, Channel आणि Technology Pivot.

Pivot म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणकोणते? हे आपण पाहिलं. आता ही Term आपण एका उदाहरणाने समजून घेऊया.

Burbn या Location Based Check-in App विषयी तुम्ही कधी ऐकलं आहे का? कसं काय ऐकणार सुरुवातीच्या काळातच त्यांनी Pivot केलं आणि ते Photo-Video Posting, Comments, Like, Share च्या दुनियेत शिरले In Short Social Media Platform म्हणून त्यांची कंपनी उदयास आली सुरुवातीच्या काळातच तोट्यात असणारी ही कंपनी आता अख्ख्या जगभरात Profitable असणाऱ्या कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. ही Profitable कंपनी म्हणजे Instagram. Instagram सारख्या अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामना करावा लागला, पण वेळेवर Pivot केल्याने त्या नंतरच्या काळात तितक्याच यशस्वीसुद्धा ठरल्या.

तर मित्रांनो आजचा हा स्टार्टअप विश्वाचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहचवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि Interesting गोष्टींसाठी नवी अर्थक्रांतीच्या दररोज वेबसाईटला भेट देत चला.

हा लेख विडीयो मध्ये पहा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button