Equity म्हणजे काय? 10 मिनिटात समजून घ्या
मित्रांनो Equity हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल कारण Business मध्ये या Equity भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असतात. आपण सुद्धा या इक्विटी बद्दल अनेकवेळा ऐकत असतो, पण इक्विटी म्हणजे नेमकं काय हे खूप कमी जणांना माहीत असतं. तर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया या Equity बद्दल.
Equity म्हणजे काय?
आपल्या मराठी भाषेत Equity ला एक सुंदर शब्द आहे तो म्हणजे ‘समभाग’. बघा या एका शब्दावरूनच लगेच समजतं की याचा अर्थ काय असू शकतो ते. आता ज्यांना ज्यांना या शब्दावरूनच समजलं असेल की Equity म्हणजे काय त्यांच्यासाठी टाळ्या! पण ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हा लेख.
तर एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इक्विटी म्हणजे भागीदारी किंवा तुमचा हिस्सा. जर तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले असतील आणि तुम्ही त्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले असतील तर याचा अर्थ असा की त्या कंपनीमध्ये तुमची हिस्सेदारी किंवा मालकी आहे म्हणजेच इक्विटी आहे. Owner Point Of View ने बघायचं झाल्यास जेव्हा तुम्ही एखादा Business चालू करता तेव्हा त्यात तुमची 100% इक्विटी असते. कारण तेव्हा त्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. पण जस जसा हा Business Grow करायला लागतो तस तसा तुम्हाला यात जास्त पैसा Invest करावा लागतो. जेव्हा तुमच्याकडे असलेला सर्व पैसा संपतो तेव्हा तुम्ही बँकेतून किंवा इतर कोणाकडून तो घेता आणि इतरांकडून घेतलेल्या याच पैशाला डेबिट(Debt) असं म्हणतात.
Equity आणि Debt मधला फरक
Equity आणि Debt ची Defination आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आली असेलच. आता आपण त्याचं उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला हॉटेल Business सुरू करायचा आहे. Business सुरु करण्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे पण तुमच्याकडे फक्त 6 लाख रुपये आहेत. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही विचार केला की, उरलेल्या ४ लाख रुपयांसाठी एखाद्या Investor कडून पैसे घ्यावेत. अशा प्रकारे तुम्ही स्वतः ६ लाख रुपये गुंतवले आणि Investor कडून ४ लाख घेतले. तर आता तुम्हाला एकूण 10 लाख रुपये मिळाले आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा हॉटेल Business सुरू करू शकता.
या उदाहरणात तुम्ही पाहिलं की तुमच्या Business ला सुरु करण्यासाठी एकूण 10 लाख रुपये लागले पण यात तुम्ही फक्त 6 लाख रुपये गुंतवले. या ६ लाख रुपयांना आपण Equity म्हणतो. याचा अर्थ तुम्ही एकूण पैशाच्या 60 टक्के (10 लाखाचे 60% = 6 लाख) पैसे गुंतवले आहेत. त्यामुळं असं म्हणता येईल की तुम्ही या हॉटेलचे 60% मालक आहात म्हणजेच Business मधील तुमची इक्विटी 60% आहे आणि 40% इक्विटी ही त्या investor ची आहे. याचाच अर्थ तुमच्यावर 40% Liability आहे. जेव्हा आपण Equity आणि Liability दोन्ही जोडतो तेव्हा त्याला Assets म्हणतात. थोडक्यात काय तर जे आपल्या मालकीचं ते म्हणजे Assets आणि जे दुसऱ्याला द्यावं लागतं ते Liability. आपण पाहिलेल्या उदाहरणात 10 लाख रुपये ही तुमची एकूण मालमत्ता आहे म्हणजेच Equity + Liability = Assets मग Equity = काय होईल तर Assets – Liability.
Equity चे प्रकार :-
1.Normal Equity Shares
समजा एक कंपनी आहे चंगू मंगू Limited. समजायला काय जातंय! हा तर या कंपनीचे संपूर्ण Shares आहेत 10 लाखाचे. जर तुम्ही चंगू मंगू Limited या कंपनीचे एक लाख Shares विकत घेतले तर या चंगू मंगू Limited कंपनीमध्ये तुमची Equity ही दहा टक्के असेल. म्हणजे तुम्ही या कंपनीचे दहा टक्के हिस्सेदार किंवा मालक असाल. याचप्रमाणे तुम्ही जर का चंगू मंगू Limited या कंपनीचे 10,000 Shares विकत घेत असाल तर या कंपनीमध्ये तुमची मालकी फक्त एक टक्का असेल. अशाच प्रकारे तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचे जेवढे जास्त किंवा जेवढे कमी Share घेतात त्या प्रमाणे तुमचा मालकी हक्क जास्त किंवा कमी होतो. आता या प्रकारात जर तुम्ही Invest केलेली कंपनी Profit मध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा Profit होईल आणि जर कंपनी Loss मध्ये गेली तर तुम्हाला सुद्धा Loss च होईल.
आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे तर दुसरा प्रकार आहे
2. Preference Equity Shares
समजा जेव्हा मी एखादा Business सुरु केला होता तेव्हा असे काही लोक होते ज्यांनी माझ्या या Business मध्ये पैसे Invest केले होते. तर याच लोकांना मी एक Preference देतो म्हणजे जरी मला या Business मधून Profit झाला किंवा Loss झाला तरी मी त्यांना त्यांचे पैसे Return देणारच म्हणजे इतर लोकांपेक्षा मी या लोकांना एक प्रकारचा Preference दिलेला आहे.
तर तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे आम्हाला Comment करून नक्की सांगा…
आणखी वाचा
- तुमच्या व्यवसायासाठी Hero Product कसे निवडावे?
- स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?
- 7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत