LTV म्हणजे काय? आणि ती कशी calculate करावी?
जेव्हा एखादा नवीन Customer तुमच्याकडे येतो, तेव्हा तो किती दिवस टिकेल, तो किती value generate करून देणार आहे, हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? हा लेख वाचल्यावर सांगता येईल. चला सुरुवात करूया. तर आजची आपली टर्म आहे LTV.
LTV म्हणजे काय?
LTV चा full form आहे Life Time Value. काहीजण याला CLTV सुद्धा म्हणतात म्हणजेच Customer LifeTime Value, तर आधी म्हटल्याप्रमाणे एखादा नवीन Customer तुम्हाला किती value generate करून देणार आहे; हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्या customer ची LTV calculate करणं गरजेचं आहे.
LTV का calculate केली पाहिजे?
तुमचा Business कितीही मोठा असो किंवा कितीही लहान असो त्यासाठी LTV काढणं हे खूप खूप गरजेचं असतं. कारण एखादा customer तुमच्यासाठी किती revenue generate करतो हे जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही तुमच्या next business strategies व्यवस्थित implement करू शकता. भविष्यात कमीत कमी पैशांत तुम्ही customer acquire करु शकता, म्हणजे तुमची Customer Acquisition Cost सुद्धा कमी होईल. आता Customer Acquisition Cost म्हणजे काय? हे माहिती आहे का…? विसरलात ना! आम्ही आधीच त्यावर detail मध्ये लेख बनवलेला आहे, तर इन-शॉर्ट Customer Acquisition Cost आणि Customer LifeTime Value ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणा हवं तर. म्हणजे एक जर कमी-जास्त झाली, तर तिचा दुसऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळं तुमची LTV ही नेहमी CAC पेक्षा जास्त हवी.
Life Time Value कशी calculate केली जाते?
LTV का calculate केली पाहिजे हे तुम्हाला समजलं असेलंच. आता ती कशी calculate केली जाते हे समजून घेण्यासाठी आपण Netflix चं उदाहारण पाहूया. तर Netflix चा जो Monthly Plan आहे तो २०० रुपयांचा आहे असं आपण समजू आणि एखादा customer Netflix चं subscription साधारण १२ महिन्यांसाठी घेत असेल.
तर LTV = Total Amount Customer Pays X Average Customer Life म्हणजे 200 X 12 = Rs. 2400/-
तर Netflix ची LTV आली Rs. 2400/-. म्हणजे एक customer त्याच्या life time मध्ये Neflix ला Rs. 2400/ मिळवून देतो.
LTV वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे?
Quality Service द्या –
तुम्ही तुमच्या customer ला जेवढी चांगली service द्याल तेवढे दिवस तो तुमच्याकडे टिकेल.
Average Order Value वाढवा
एखाद्या customer ला तुमच्याकडे रोजच्यापेक्षा जास्त खर्च करायला लावा. जसं की जर तुमचं छोटं हॉटेल असेल आणि एखादा customer तुमच्याकडे नाष्टा करण्यासाठी आला, तर तुम्ही त्याला चहा पिण्यासाठीसुद्धा convince केलं पाहिजे. कारण तुमच्या प्रॉडक्टवर जेवढा त्याचा खर्च वाढेल, तेवढी तुमची LTV वाढेल.
Subscription based service द्या –
तुमच्या बिझनेसमध्ये subscription based service model आणता येतंय का ते पहा. कारण यामध्ये फायदा दोघांचाही होतो. एक म्हणजे तुम्हाला एकदम महिन्याभराचे, वर्षभराचे पैसे मिळतात. दुसरं म्हणजे जर एखादा customer तुमच्याकडे वर्षभरासाठी आहे हे तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही त्याला discount सुद्धा देऊ शकता. ज्याचा फायदा त्या customer ला सुद्धा होतो. Amazon, Netflix यांसारखे OTT platforms तेच तर करतात.
Customer Retention वर भर द्या –
Customer Retention म्हणजे काय तर एखाद्या customer ला तुम्ही तुमच्याकडे किती काळ टिकवून ठेवता याचा rate. वेगवेगळ्या offers, discounts, rewards देऊन तुम्ही हा rate वाढवू शकता.
तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण LTV म्हणजे काय? LTV का calculate केली पाहिजे? ती कशी calculate केली जाते? ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर आत्ताच like करा आणि तुमच्या बिझनेस करणाऱ्या मित्रांना शेअर करा.