Customer Segmentation: काय आहे आणि कसे कराल?
मागच्या दोन लेखांमध्ये आपण Conversion Funnel, Customer Acquisition Cost या स्टार्टअप विश्वातील दोन terms विषयी बोललो. या दोन्ही terms एकमेकांशी related होत्या. आजची जी term आहे, तीसुद्धा या दोन्हीशी संबंधितच आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीचे लेख पाहिले नसतील, तर ते लेख पाहून घ्या. आजच्या लेखा मध्ये आपण बघणार आहोत customer segmentation बाबत.
Customer segmentation म्हणजे काय?
एक अशी process की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या customer च्या एका मोठ्या group ला छोट्या छोट्या segments मध्ये divide करता. यालाच Market segmentation असंही म्हंटल जातं.
Customer segmentation का महत्वाचं आहे?
कंपनीला आपल्या customer ला effectively target करणं सोपं जातं. समजा तुमच्या customer base मध्ये 15 वर्षाचे आणि 50 वर्षाचे दोन्ही customer आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही same marketing strategy वापरू शकता का? तर नाही. पण तुमच्या customer base मध्ये या दोन्ही age group चे customer आहेत हे कळणं आधी जास्त महत्त्वाचं आहे आणि हे कळण्यासाठी तुम्हाला फायदा होतो तो Customer segmentation चा.
यामुळे कंपनीला personalized marketing करायला सोप्पं जातं, जे की impersonal marketing च्या तुलनेत जास्त effective असतं. समजा तुम्हाला smartwatch खरेदी करायचं आहे आणि तुम्ही ते flipkart, amazon सारख्या site वर search केलं, तर दुसऱ्या मिनिटापासून लगेचच तुम्हाला instagram, facebook सारख्या social media platforms वर smartwatches च्या ads दिसायला लागतात. जेणेकरून तुम्ही ते लगेच खरेदी केलं पाहिजे तर हे झालं personalized marketing. हे शक्य झालं कारण flipkart, amazon या कंपन्यांचं segmentation इतकं strong आहे की तुमच्या साध्या search वरून सुद्धा ते लगेचच तुमचं segmentation करतात.
Customer segmentation कसं करावं?
तुमच्या customer चं segmentation करण्याआधी तुमच्याकडे customer चा data असणं गरजेचं आहे. हा डेटा तुम्हाला वेगवेगळ्या surveys, customer च्या purchase history मधून किंवा अशाच आणखी काही गोष्टींमधून मिळू शकतो.
Customer segmentation च्या चार main categories आहेत.
Geographical Segmentation:-
सर्वात basic category म्हणजे Geographical Customer segmentation. या category मध्ये तुम्ही तुमच्या customer चं त्याच्या भौगोलिक म्हणजेच geography नुसार segmentation करता. तुम्ही निवडलेली geographical category ही एखाद्या गल्ली, colony पासून ते थेट एखाद्या देशापर्यंत सुद्धा असू शकते, पण जेव्हा तुम्ही segmentation साठी ही category निवडता, तेव्हा तुम्हाला बारीक लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं.
Demographical Segmentation:-
Segmentation ची दुसरी category म्हणजे Demographical Segmentation. या category मध्ये तुम्ही तुमच्या customer ला Demographic factor जसं की age, gender, education, Nationality, income, marital status, and occupation नुसार divide करता. याचा फायदा तुम्हाला customer च्या particular needs आणि interest समजून घ्यायला होतो. आधी पाहिलेलं smartwatches चं उदाहरण याच category मध्ये येतं. Demographical Segmentation मुळं तुम्हाला customer साठी personalized marketing करण सोप्पं जातं. Personalized marketing मध्ये तुम्ही ज्या audience ला target करता, तेव्हा त्या audience मधले जास्तीत जास्त लोकं तुमचे product घेण्यास इच्छुक असतात. त्यामुळं तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी काही प्रमाणात का होईना कमी खर्च होतात.
Psychographical Segmentation:-
Segmentation ची पुढची category म्हणजे Psychographical Segmentation. या category मध्ये तुम्ही तुमच्या customer च्या characteristics चा जसं की lifestyle, values, social class, personality यांसारख्या गोष्टींचा विचार करता. Segmentation मधल्या इतर category पेक्षा या category नुसार segmentation करण जरा अवघड आहे, कारण यात तुम्हाला customer च्या psyche चा विचार करावा लागतो.
Behavioral Segmentation :-
जेव्हा तुम्ही Behavioral Segmentation नुसार customer ला divide करायला जाता तेव्हा तुम्हाला त्यांचे usage, loyalties, awareness, knowledge, liking आणि purchase patterns विचारात घ्यावे लागतात. For example Uber किंवा Ola सारखे apps त्याच customer ला काहीतरी offers देतात, की ज्यांनी त्या app चा बऱ्याच दिवसापासून वापर केलेला नाही ते कधीही त्या customer ला offers देत नाहीत जे त्यांचे regular users आहेत म्हणजे इथे येते ती customer loyalty जी की Behavioral Segmentation चाच भाग आहे.
तर आजच्या Article मधून Customer च segmentation म्हणजे काय, ते करणं का महत्त्वाचं आहे, ते कसं करावं, त्याच्या categories कोणकोणत्या आहेत या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. Hope so तुम्हाला त्या कळल्या असतीलच. जर या गोष्टींतून काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल आपल्याप्रमाणेच इतर लोकांनासुद्धा या गोष्टी माहित व्हाव्या, तर हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की नक्की share करा आणि subscribe करा.