Alpha Testing & Beta Testing । स्टार्टअप विश्व
नवी अर्थक्रांतीच्या स्टार्टअप विश्व या नव्याकोऱ्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. या सिरीजमध्ये स्टार्टअप विश्वातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेत असतो. तर आजची आपली टर्म आहे अल्फा टेस्टिंग. चला तर मग सुरुवात करूया.
प्रत्येक कंपनीला आपण निर्माण केलेले product हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि त्यांना ते आवडावे असं वाटत असतं. बर्याच कंपन्या या त्यांच्या product च्या पहिल्या sale वरून ते product किती जणांना आवडलं हे ठरवतात, तर इतर कंपन्या या Acceptance Testing चा मार्ग निवडतात. Alpha Testing हा Acceptance Testing चाच एक भाग आहे.
Alpha Testing मध्ये कंपनीने बनविलेले product हे मार्केटमध्ये विकण्याआधी तिथल्या कर्मचाऱ्यांना testing साठी दिले जाते. ज्यामुळे product मधले pros आणि cons सहजरित्या समजतात आणि त्यावर काम करायलासुद्धा वेळ मिळतो. Alpha Testing ला काही लोक usability testing सुद्धा म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या product चे Alpha Testing करता, तेव्हा ते product हे पूर्णपणे तयार झालेले असते; पण त्यातल्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्याचा तोटा end users ला होऊ नये म्हणून ही test अत्यंत गरजेची असते. Product मध्ये असलेल्या छोट्या छोट्या त्रुटींचा परिणाम हा product च्या sale वर होत असतो. कमीत कमी त्रुटी असलेले product जेव्हा कंपनी market मध्ये लाँच करते तेव्हाच त्याचा जास्तीत जास्त खप होण्याची शक्यता असते. Product चं alpha version ग्राहकांसाठी कधीच नसतं. त्यामुळे ते कधीही market मध्ये लाँच केलं जात नाही.
Alpha Testing मध्ये Testing Team ला ते प्रॉडक्ट जसं बनवलं गेलं पाहिजे होतं, तसंच झालंय का हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. यासाठी कधी कधी कंपनीमध्ये त्या त्या क्षेत्रातील experts ला सुद्धा बोलावलं जातं. जेणेकरून product मध्ये कमीत कमी त्रुटी राहतील.
Beta Testing
आता वळूया Beta Testing कडे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बीटा टेस्टिंग म्हणजे नेमकं काय? तर अल्फा टेस्टिंग नंतरची स्टेप म्हणजे बीटा टेस्टिंग. ज्यावेळी तुमच्या एखाद्या सर्व्हिसची किंवा प्रॉडक्टची अल्फा टेस्टिंग यशस्वी होते. त्यानंतर तुमचे प्रॉडक्ट बीटा टेस्टिंगसाठी पाठवले जाते. तुमच्या प्रॉडक्टचा अभिप्राय मिळविणे हाच त्यामागचा मुख्य उद्देश असतो.
बीटा टेस्टिंगला फील्ड टेस्टिंग असेही म्हणतात.
कोणतंही प्रॉडक्ट थेट मार्केटमध्ये लाँच करणं थोडं रिस्की असतं. ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये येण्याआधी पहिल्यांदा काही लोकांकडे वापरण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून येणाऱ्या सुचनांनुसार तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतात. बीटा टेस्टिंगमुळे आपल्याला कस्टमरचा फीडबॅक मिळतो. त्यामुळे प्रॉडक्टची क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.
Alpha Testing मध्ये कंपनीतले कर्मचारीच प्रॉडक्ट टेस्टिंग करतात, तर Beta Testing मध्ये बाहेरचे टेस्टर्स प्रॉडक्ट टेस्टिंग करतात. आपण ज्यावेळी एखादे अॅप्लिकेशन वापरत असतो, त्यावेळी आपल्याला त्यांचा फीडबॅकसाठी मेसेज येतो. आपल्याला आलेल्या अनुभवानुसार आपण तो फीडबॅक देत असतो आणि तो फीडबॅक वाचून कंपनी त्यात बदल करत असते.
शेवटी काय Alpha Testing आणि Beta Testing चा मूळ उद्देश एवढाच आहे की शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहचणारं प्रॉडक्ट हे flawless म्हणजेच दोषविरहित असावं.