तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या
आपल्या सर्वांना जीवनात यशस्वी व्हायचे असते. म्हणूनच सतत काहीतरी करण्याची आपली वृत्ती असते. व्यक्तिपरत्वे यश मिळवण्याचा मार्ग हा भिन्न असतो. काहीजणांसाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवून स्वतःला भौतिक गोष्टींनी समृद्ध बनवणे म्हणजे यश असते. तर काही जण त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत पुढील स्तरावर जाण्यासाठी पुढील अभ्यास करून यश संपादन करतात.
तरीसुद्धा, तुम्हाला जीवनात खरोखर काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ओळखणे आवश्यक आहे. यावरून तुम्ही कोणत्या मार्गावर जावे आणि कोणती पावले उचलावीत याचे स्पष्टीकरण मिळते.
बिल गेट्स यश मिळवण्याचे रहस्य सांगतात कि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर काम करायला सुरवात करा. ते स्वतः वयाच्या १३व्या वर्षांपासून कॉम्पुटर क्षेत्रात काम करत आहेत आणि ते किती यशस्वी आणि प्रभावशाली झाले आहेत हे आपण पाहतच आहोत. Facebook चे CEO, मार्क झुकेरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी असताना त्यांची आताची अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी केली. आज फेसबुक हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. वय हा यशाचा निर्णयात्मक घटक नसला तरी आपण पुरेसे मोठे आणि स्थिर होण्यापर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही.
जीवनात यश कसे मिळवायचे?
आपण सहसा यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजकांची भाषणे मुलाखती ऐकतो, या आशेने की त्यांनी यश मिळवण्यासाठी वापरलेली रणनीती आपण वापरू शकतो. परंतु, त्यांची कोणती रणनीती आपल्यासाठी लागू आहे याचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. त्यांची रणनीती प्रत्येक वेळी आपल्याला लागू पडेलच असे नसते. त्या मुळेच खालील पायऱ्या तुम्हाला तुमच्या स्टार्टअपमध्ये यश मिळविण्यात नक्कीच मदत करतील.
पहिली पायरी: जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता ठेवा
शीर्षक सगळं स्वतःच स्पष्ट करते. तुम्हाला जीवनात यश मिळवता येण्यासाठी, तुमच्या जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. स्वतःला विचारा, “मला खरोखर काय साध्य करायचे आहे?” तुम्हाला तुमच्या आयुष्यात बर्याच गोष्टी साध्य करायच्या असतील, प्रत्येक ध्येयाचा त्याच्या प्राधान्यानुसार क्रम लावा. त्यातील कोणते जवळचे आहे कोणते लांबीचे आहे हे ठरवा आणि त्यानुसार ध्येयात स्पष्टता आणा.
दुसरी पायरी: प्रेरणा शोधा
तुमचे ध्येय हे तुमच्यासाठी खरी प्रेरणा असले पाहिजे, काहीवेळा जेव्हा तुमचे उद्दिष्ट पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो किंवा तुम्ही ठरवल्याप्रमाणे काही घडत नाही तेव्हा निराशा येते. अशा वेळी, स्वतःला हे स्मरण करून दिले पाहिजे कि आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचीय आहेत. त्यामुळे मागे हटण्यापेक्षा आपण काय चुकीचे करत आहोत याचे मूल्यांकन करणे आणि आपल्या चुका सुधारणे हे जास्त संयुक्तिक आहे.
तिसरी पायरी: टाइमलाइन तयार करा
वेळ कुणासाठीही थांबत नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एक टाइमलाइन असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही नियोजित वेळेत चालत राहता आणि सर्वात वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे पाहता. तुमचे ध्येय कालबद्ध असल्यास, ठरवलेल्या वेळेत ते साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नानांची पराकाष्टा करता.
चौथी पायरी: तुम्ही काय करणार आहेत याची योजना बनवा
हे तुमच्या कृतींशी संबंधित आहे. तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे? त्यासाठी आवश्यक उपाययोजना न करता नियोजन करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे, योजना न करता गोष्टी करणे म्हणजे वेळ आणि पैसे व्यर्थ घालवणे. म्हणूनच, यश मिळविण्यासाठी नियोजनाप्रमाणे कृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमची टाइमलाइन वापरून, तुमची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे योग्य नियोजन करा.
पाचवी पायरी: एक आकस्मिक योजना तयार करा
बदल हा सतत होत असतो. त्यामुळे अपरिहार्य आणि अचानक होणाऱ्या बदलांना सामोर जाण्यासाठी तयार राहा. त्यासाठी तुमच्या योजना आणि उद्दिष्टे लवचिक बनवणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आकस्मिक योजना (प्लॅन B) असणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरुन गोष्टी नियोजनानुसार होत नसतील तर आपण मार्ग बदलू शकतो. बर्याचदा, या आकस्मित नियोजनामुळे आपल्याला खात्री मिळते की, आपले ध्येय साध्य करण्याचा अजून एक मार्ग आहे. यामुळे आपण पुढे होणारे नुकसान कमी करु शकतो.
सहावी पायरी: विश्वास ठेवा
तुम्ही आधीच प्रत्येक पायरीचे काटेकोरपणे पालन केले आहे. आता पुढची पायरी म्हणजे नशीब तुमच्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवणे आणि सर्व काही तुमच्या नियोजनानुसार करत राहणे.
सातवी पायरी: आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत चला
आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत राहणे ही चांगली सवय आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समजाचे आपण देणे लागतो ही भावना नेहमी तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यास मदत करते आणि यामुळे तुमचे शत्रू देखील कमी होतात. लोकांकडून मिळालेल्या सद्भावना नेहमीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.