उद्योजकता विजडमलेखमालिका

व्यावसायिकांनी ब्रॅंडिंगचे तंत्र समजून घ्यावे

एक बिल्डर आमच्याकडे आले. त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये ६० फ्लॅट विक्रीविना पडून होते. त्याचा खप लवकर व्हावा म्हणून त्यांनी विविध ठिकाणी केवळ एक महिन्यात १० ते १२ लाख रुपये खर्च केले; पण फ्लॅट काय विकले गेले नाहीत. काय चूक झाली त्यांची? म्हणतात ना, तूप खाल्यावर रूप येत नाही किंवा आज लावलेल्या झाडाला उद्या लगेच फळे लागत नाहीत. किंवा आज मेकअप करून उद्या कोण हिरॉईन होणार नाही, दिल्लीत यूपीएससीचा क्लास लावला म्हणून कोणी आयएएस ऑफिसर होणार नाही. जगात कोणताही रिझल्ट किंवा यश असे सहजासहजी मिळत नाही. बिझनेसचेही तसेच आहे, फक्त पैसा खर्च केल्यानेच काही होत नाही. मार्केटिंगची व ब्रँडिंगची नियोजनबद्ध प्रक्रिया पार पाडावी लागते. त्या त्या गोष्टीला कालावधी घ्यावा लागतो.

आज १० किलो तूप प्यायल्यावर उद्याच्या उद्या कोण पैलवान होणार नाही. उलट आहे ती तब्येतही ढासळेल. पण त्याऐवजी त्याने रोज ५० ग्रॅम तूप प्यायले व १ तास व्यायाम केला तर त्याची तब्येत नक्कीच सुधारून तो पैलवान होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पुढे जाऊन तो रोज १०० ग्रॅम, २०० ग्रॅम असे तूप पिणे वाढवू शकतो. त्याचबरोबर त्याला व्यायामही वाढवावा लागेल. तसेच कोणत्याही व्यवसायात अचानक जाहिरातबाजी करून फायदा होत नसतो. तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला शास्त्रीय पध्दतीने ब्रँडिंग व मार्केटिंगचे प्लॅनिंग करून राबवावे लागते. फ्लॅट खपत नाहीत म्हणून १० लाख जाहिरातींवर घालविले म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे. अगोदरच खप नाही, त्यात १० लाख वाया! व्यवसायात कोणत्याही नियोजनाशिवाय खर्च केलेला पैसा वाया जाऊन नुकसानीस सामोरे जावे लागते. आज जाहिरात केली आणि उद्या प्रॉडक्ट खपला एवढं सोपं नाही.

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button