स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?
रोज क्षणा क्षणाला आपली स्पर्धा सुरू असते. कधी इतरांबरोबर तर कधी स्वतःशीच. पण, प्रत्येक वेळी आपण जिंकूच असे नाही. कधी कधी पराभवही होत असतो. खचून न जाता प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यात जास्त यश असते. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ याप्रमाणे आपले करिअर सुरू असते. आपण यशाचीच अपेक्षा जास्त ठेवत असतो आणि कधी कधी एखाद्या गोष्टीत मागे पडतो. आता हे मागे पडायचे नसेल, तर काही टीप्स
कामात परफेक्शन हवे
नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.
प्रामाणिकपणा
नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.
स्वतःला ठेवा अपडेट
काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.
आत्मविश्वास
आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.
Be Positive & All the best
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता