उद्योजकताबिझनेस स्टोरीझ

‘LinkedIn’ ची सुरुवात कशी झाली?

हा प्लॅटफॉर्म  इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतरांशी तुलना केल्यास वेगळा आढळून येतो. काळाच्या ओघात याचे महत्त्व वाढतच चालले आहे. काय आहे यामागची स्टोरी आणि कशी झाली याची सुरुवात हेच जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून.

‘LinkedIn’ ची सुरुवात – 

‘LinkedIn’ अधिकृतपणे 5 मे 2003 ला लाँच करण्यात आले, पण त्याची खरी  सुरुवात 2002 मध्येच झाली होती. रीड हॉफमॅन यांनी आपल्या लिविंग रूम मध्ये LinkedIn ची सुरुवात केली.  हॉफमॅन यांच्यासोबत त्यांचे पे-पल आणि सोशल नेट कंपनीतील सहकारी होते. त्यांचा हा प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा मूळ उद्देश प्रोफेशनल विश्वातील लोकांची एकमेकांशी ओळख व्हावी,  या माध्यमातून ते जोडले जावेत आणि त्यांचा एकमेकांना फायदा व्हावा असा होता. 

the-story-of-linkdin-reid-hoffman-cofounder-of-linkdin

चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर लिंक्डइनला हळूहळू ओळख मिळून प्रसिद्धी वाढू लागली. 2008 मध्ये लिंक्डइन स्पेन. यु.के आणि फ्रान्समध्ये वापरले जाऊ लागले. त्याच वर्षी त्यांच्या युजर्सच्या आकड्याने उच्चांक गाठला आणि तो 15 मिलियन पर्यंत (१.५ कोटींपर्यंत) पोहोचला. 2011 येईपर्यंत युजर्सचा हा आलेख वेगाने वाढतच गेला आणि कंपनीच्या युझर्सची संख्या 15 पासून 100 मिलियन (१० कोटींपर्यंत) पोहोचली. 2013 मध्ये LinkedIn सुरु करून 10 वर्षे पूर्ण झाली. युजर्सची होत जाणारी वाढ हा योग्य फीचर्स आणि वेळोवेळी केलेल्या बदलांचा परिणाम होता. त्यानंतर त्यांनी नुकतेच ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आणि चांगल्या जॉब च्या शोधात असणारे तरूण यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात  केली. यामुळे त्यांच्या यशात आणखी भर पडत गेली.  2016 मध्ये मायक्रोसॉफ्ट ने LinkedIn $26 बिलियन ला विकत घेतले. 2017 मध्ये LinkedIn  ने डेस्क2 साठी नवीन फिचर सुरु केले आणि 2019 मध्ये आणखी काही फीचर्सची वाढ करून LinkedIn ने स्व त:ला परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला. 

LinkedIn ची सध्याची परिस्थिती 

LinkedIn च्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्मची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. हे जागतिक स्तरावर  युझर्सच्या बाबतीत अव्वल आहे, त्यातले बहुतेक व्यावसायिक आहेत. आणि प्रत्येक आठवड्यात दहा लाखांहून अधिक नवीन वापरकर्ते सामील होत आहेत.

Linkdin

Linkedin बद्दल महत्त्वाच्या बाबी 

70% पेक्षा जास्त युजर्स यूएस बाहेरील आहेत.

90 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते वरिष्ठ-स्तरीय आहेत आणि 63 दशलक्ष निर्णय घेण्याच्या पदांवर आहेत.

50% पेक्षा जास्त  वापरकर्ते महाविद्यालयीन पदवीधारक  किंवा सुशिक्षित तरूण आहेत.

24% युजर्स  18-24 वर्षे वयोगटातील लोक आहेत. 

the-story-of-linkdin-reid-hoffman-cofounder-of-linkdin


आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button