Sunday Motivation – जर्सी नंबर दहा. योगायोग असेल, पण हा दहा नंबर आपल्याकडे होता क्रिकेटच्या देवाचा. जर्सीवर १० दिसलं की सचिन आठवतो आपल्याला. सचिन तेंडुलकर सारखाच हा दहा नंबर आणखी एकाच्या बाबतीत फेमस आहे. लिओनेल मेस्सी. हा योगायोग असला तरी दोघांच्याही चाहत्यांची संख्या कोट्यावधींच्या घरात. वागणंही सारखंच. मितभाषी. संयत. आणि खेळही तसाच अफलातून!
एक बॅटनं बोलणारा, दुसरा पायांची जादू दाखवणारा. सचिन मैदानात असेपर्यंत टीम इंडियाच्या विजयाची खात्री. तसंच मेस्सीचं.
1. Self Believe
वयाच्या पाचव्या वर्षापासून मेस्सीची फुटबॉलशी नाळ जुळली. त्याला दोन भाऊ अन् एक बहीण. भावांसोबत तो फुटबॉलचा आनंद लुटायचा. आपल्या मोठ्या भावांचे फुटबॉल सामने पाहायला तो जायचा. वडील जॉर्ज मेस्सी आणि आई सेली हे त्याला एकदा त्याच्या भावाच्या क्लबमध्ये सराव दाखवायला घेऊन गेले. तेव्हा मेस्सी होता पाच वर्षांचा. त्याला तिथं ‘लहान बाळ’ म्हणूनच ट्रीट केलं जात होतं. पण त्या वयातही जवळ असलेल्या फुटबॉलशी मोठ्या खुबीनं तो खेळत होता. हीच गोष्ट एका प्रशिक्षकानं पाहिली अन् त्याला मेस्सीतलं अनोखं रूप दिसलं. त्यांनी त्याला मैदानात उतरायला सांगितलं. मेस्सीचा खेळ पाहून प्रशिक्षकही अवाक् व्हायचे. तीन-चार खेळाडूंचे अडथळे तो तेव्हापासूनच सहज पार करायचा. अर्जेंटिनामध्ये असल्यापासून त्याने या खेळात आपली जादू दाखवायला सुरुवात केली होती. एकापाठोपाठ एक स्पर्धा तो आपल्या गोलने गाजवत होता. अशातच १० वर्षाचा असताना त्याला एक आजार झाला. तो होता ‘ग्रोथ हार्मोन’ कमी असण्याचा. या आजारात शरीराची वाढ पूर्णपणे थांबते. डॉक्टरांनी सांगितलं की हा आजार बरा होण्यासाठी त्याला तीन वर्षं एक injection दर महिन्याला घ्यावं लागेल ज्याची किंमत होती 900 dollar म्हणजे आजचे जवळपास ७० ते ७५,०००. मेस्सीचे वडील जॉर्ज हे स्टील फॅक्टरीत कामगार होते, तर आई पार्ट टाईम काम करायची. दर महिन्याला एवढे पैसे खर्च करण्याची त्यांची परिस्थीती नव्हती. वडिलांच्या कंपनीकडून विमाखर्च मिळायचा, पण तो केवळ दोन वर्ष पुरेल एवढाच होता़ मेस्सी त्या काळात ‘नेवेल्स ओल्ड बॉईज’ नावाच्या क्लबकडून खेळायचा. वडिलांनी आर्थिक मदतीसाठी नेवेल्स क्लबकडे विनंती करून पाहिली, पण प्रतिसाद मिळाला नाही. एका क्लबच्या मालकानं आधार देण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळात देशात मंदी आली. त्या क्लब मालकाचा धंदा डबघाईस आला अन् त्यानंही मदत बंद केली. मेस्सीचे उपचार बंद झाले. पण त्याच्या घरच्यांनी प्रयत्न थांबवले नाही. बार्सिलोनाच्या कॅटालोनिया भागात त्यांचे नातेवाईक होते. त्यांनी तिथे प्रयत्न केले.
अखेर स्पेनमध्ये बार्सिलोना क्लबचा आधार मिळाला, पण अडथळ्यांशी स्पर्धा नसेल तर तो मेस्सीचा प्रवास कसला. बार्सिलोना क्लबच्या संचालक मंडळाने एवढ्या लहान खेळाडूशी करार करण्यास नकार दिला, पण चार्ली रेक्सश नावाचे संचालक मेस्सीसाठी अडून बसले. त्यांना मेस्सी हवाच होता. त्यांना मेस्सीवर उपचार होणं गरजेचं वाटत होतं. शेवटी पेपर नॅपकिनवर करार करून १३ वर्षांच्या लिओनेल मेस्सीचा La masia मध्ये प्रवेश झाला. सुरुवातीला या बाहेरून आलेल्या मुलाचा छळ team manager पासून ते त्याच्यासोबत असलेल्या इतर प्रत्येक मुलाने केला. ही मुलं मेस्सीला खेळता खेळता मुद्दामहून लाथा मारायचे, त्याच्याकडे ball pass करायचे नाहीत, तर कधी कधी छोट्या चुकांमुळे खूप ओरडायचे. Messi खूप शांत राहिला लागला अनेकांना सुरुवातीला वाटलं की हा मुलगा बहुतेक मूक असावा म्हणजे याला बोलता येत नसावं. हा काळ Messi साठी खूप कठीण होता. त्याचं कुटुंब हे Argentina मध्ये होतं, तर तो त्याच्या वडिलांसोबत स्पेन मध्ये रहायचा.
दोन वर्षांपूर्वी मेस्सीला जेव्हा हा आजार झाल्याचं समजलं तेव्हा जागतिक स्तरावर football खेळण्याचं त्याचं स्वप्न अधुरंच राहील असं प्रत्येकाला वाटायला लागलं होतं, पण फक्त एका व्यक्तीला सोडून आणि ती म्हणजे त्याची आज्जी. Leo ची प्रत्येक match पाहणाऱ्या आज्जीला leo वर खूप भरोसा होता. पण याच काळात आज्जीचं निधन झालं अन leo ला दुसरा झटका बसला. पण जाता जाता आज्जी Leo साठी एक महत्त्वाचं काम करून गेली आणि ते म्हणजे तिने leo च्या आत्मविश्वासाला जागृत केलं. ती सतत Leo ला सांगायची की तू special आहेस एक दिवस खूप मोठा खेळाडू बनशील. ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्या गोष्टी आपल्या सोबत घडायला लागतात. १३ वर्षाचा मेस्सी जेव्हा Barcelona क्लब मध्ये दाखल झाला तेव्हा तिथे आलेल्या कोणत्याच संकटाला तो घाबरला नाही. कारण त्याचा स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास होता. आज्जीने आपल्यामध्ये जागवलेल्या विश्वासाबद्दल मेस्सी हा तिच्याबद्दल कायम ऋणी राहिला. शतक झळकावल्यानंतर सचिन तेंडुलकर आकाशाकडे बघतो, बॅट आणि हेल्मेट हाती घेऊन वर पाहून वडिलांना अभिवादन करतो. तसंच मेस्सीचंही. गोल मारल्याच्या आनंदानंतर मेस्सीही वर पाहतो. प्रत्येक गोलनंतर त्याला त्याची आजी आठवत असते. प्रत्येक गोल तो तिलाच समर्पित करतो.
2. Desire to Always Get Better
एका interview मध्ये messi ला विचारलं गेलं की, “तुझ्या मध्ये अशी काय गोष्ट आहे की जी तुला जगातील सर्वात महान खेळाडू बनवते?” त्यावर Messi ने शांतपणे उत्तर दिले, “My Desire to Always Get Better.” मला सतत असं वाटतं की मी कालच्यापेक्षा आज जास्त चांगल्या पद्धतीने खेळू शकतो.
3. Give your 100%
जेव्हा Messi ला विचारण्यात आलं की, “तू football खेळणाऱ्या young players ला काय advice देशील?” तर Messi म्हणतो, “जर तुम्हाला काहीतरी अफाट करायचं असेल, तर प्रत्येक क्षणाचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे कारण की संधी ही एकदाच येते आणि त्यावेळी जर तुम्ही तुमचे 100% दिले नाहीत, तर त्या संधीची माती व्हायला फार वेळ लागत नाही. Messi पुढे म्हणतो. ‘जेव्हा केव्हा मी मैदानावर असतो तेव्हा मला कोणत्याच प्रकारचा doubt नसतो, कारण प्रत्येक वेळेस मी माझे 100% देत असतो.’ कोणतीही अफाट गोष्ट करण्यासाठी commitment गरजेची असते. ही commitment तुम्ही स्वतःला देता की इतरांना देता यावर गोष्टी बदलत नाहीत, तर ही commitment तुम्ही स्वतः कशा पद्धतीने पाळता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
4. Chase the dreams
Messi म्हणतो मी कधीच पैसा मिळवण्यासाठी खेळलो नाही, मी खेळलो ते फक्त माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. जर मला या खेळातून पैसे मिळाले नसते, तर कदाचित मी आज फुकट खेळलो असतो आणि आनंदात राहिलो असतो. त्यामुळं पैशाचा, प्रसिद्धीचा पाठलाग करू नका, नेहमी तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच तुमच्यामागे येतील.
मेस्सीने आपल्या कारकिर्दीत football मधले जेवढे शक्य आहे तेवढे सगळे cups, awards जिंकले. फक्त एक cup सोडून आणि तो म्हणजे World Cup. जगातल्या प्रत्येक खेळाडूला हेवा वाटावा अशी बहारदार कारकीर्द घडवणाऱ्या मेस्सीलाही याच गोष्टीचं शल्य होतं. ३५ वर्षाचा मेस्सी यंदा आपला शेवटचा World Cup खेळत होता. तो खेळत असलेल्या Argentina टीमची सुरुवात काहीशी खराब झाली, पण हळूहळू टीमने आपली कामगिरी उंचावली. पुढे सरकणाऱ्या World Cup सोबतच Messi सुद्धा आपल्या स्वप्नाकडे एक एक पाऊल टाकत होता. १८ डिसेंबर २०२२ कतार मध्ये रंगलेल्या या स्पर्धेचा अखेरचा दिवस उजाडला. 120 मिनिटांपेक्षा जास्त चाललेल्या या match मध्ये Argentina चा Goalkeeper असलेल्या Martínez ने penalty shootout मधला goal अडवला आणि जगभरातल्या क्रीडाप्रेमींच्या डोळ्यातले आनंदाश्रू अनावर झाले. Argentina जिंकली. Messi जिंकला. Football जिंकले. आणि स्वप्न सत्यात उतरले.
तुम्हाला आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Sunday Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
आणखी वाचा