जितके जास्त स्किल्स, तितकी जास्त कमाई
हो हे खरंच आहे; जितके जास्त स्किल्स, तितकी जास्त कमाई. म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर स्किल्स म्हणजे कौशल्यं. तुमच्याकडे जितकी जास्त कौशल्ये असतील, तुम्ही तितकी जास्त कमाई करू शकता.
सध्याच्या जगात फक्त शिक्षण आणि डिग्री याचे जास्त महत्व न राहता, किती स्किल्स आहेत याला जास्त किंमत आहे. एक काळ होता जेव्हा आपण विचार करायचो, एकदा डिग्री मिळाली की नोकरी पक्की. पण मित्रांनो आता काळ बदलला आहे. आता कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्याकडे स्किल्स असणे महत्वाचे आहे. किमान स्किल्स असतील तर एखाद्या क्षेत्रात त्याआधारे इंटर्नशिप करून तुम्ही तुमचा जॉब पक्का करू शकता. तुम्ही जर आधीपासूनच नोकरी करत असाल तर काही एक्स्ट्रा स्किल्समुळे तुम्ही एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता. तुम्ही शिक्षण घेत असाल तर अशा स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही पार्ट टाईम काम करून किंवा फ्रीलान्स काम करून पैसे कमवू शकता.
मित्रांनो काय करू शकतो हे तर आपण पाहिलं. आता आपण हे पाहणार आहोत यासाठी नेमके मार्ग कोणते कोणते आहेत आणि या सर्व मार्गांचा अवलंब आपण कसा करू शकतो.
इंटरनेटच्या या युगात सध्या रिसोर्स मिळवणे काही अवघड नाही आहे. इंटरनेटचा योग्य आणि पुरेपूर वापर करता आला, तर आपण नुसती कमाई नाही तर एक व्यवसाय उभा करू शकतो. एका सामान्य माणसाच्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींची एक सर्वसामान्य यादी आपण तयार केली, तर त्यात सकाळी उठल्यापासून हेल्थ केअर, मॉर्निंग रुटीन, ब्रेकफास्ट, व्यायाम, जॉब, इव्हिनिंग रुटीन, रात्रीचे जेवण आणि झोपणे यासोबतच सुट्टीच्या दिवशी पर्यटन आणी मनोरंजन या साऱ्या गोष्टी येतात. या गोष्टींचा विचार केला तर फूड, आरोग्य, पैसा, मनोरंजन, पर्यटन, ई-कॉमर्स या सेक्टरमध्ये काम करून, त्याच्याशी संबंधित स्किल्स डेव्हलप करून आपण कमाई करू शकतो.
आता या सर्वसामान्य सेक्टरचा विचार करता नेमके कोणते किमान स्किल्स आपण आत्मसात करणे गरजेचे आहे ते पाहूया. सध्याच्या काळात माणसाचे आयुष्य प्रचंड धकाधकीचे आणि व्यस्त होत चालले आहे. माणूस जगतो कमी आणि ट्रॅफिकमध्ये अडकतो जास्त. अशावेळी सर्व प्रकारचे सण समारंभ यासाठी लागणारी सजावट आणि डेकोरेशन, तसेच भेटवस्तू या सर्व गोष्टींचा आपण घरबसल्या व्यवसाय सुरु करू शकतो.
कोव्हीडनंतर लोक आपले आरोग्य जपण्यासाठी खूप जास्त प्राधान्य देताना आपल्याला दिसतात. अशावेळी योगा आणि जिमचे कौशल्य आत्मसात करून तुम्ही घरबसल्या हेल्दी लाईफसाठी ऑनलाईन क्लास किंवा कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. यासोबतच फ्रीलान्स क्षेत्र सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी डिजिटल माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सची विक्री करून तुम्ही मोठ्या प्रमाणावर इन्कम मिळवू शकता. डिजिटल माध्यमांचा विचार करता डिजिटल मार्केटिंग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व फिल्डसाठी अनेक मोफत ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस करून यातील सर्व स्किल्स वापरून आपण आपला एक्स्ट्रा इन्कम सोर्स सुरु करू शकतो. जितके जास्त स्किल्स आपण विकसित करू, तितकी जास्त कमाईची अनेक दारं आपल्यासाठी खुली होणार आहेत. त्यासोबतच तुम्ही वर्तमानात जो जॉब करत असाल किंवा शिक्षण घेत असाल, अशावेळी या स्किल डेव्हलपमेंटमुळे भविष्यात तुम्ही तुमची प्रोफाईल अजून मजबूत करू शकता. मल्टिटास्किंग क्षमता वाढवू शकता.
मित्रांनो तरुण वय हे मोठमोठ्या रिस्क घेण्यासाठीच असते. याच वयात आपण मानसिकरित्या अनेक कौशल्ये विकसित करण्याची आणि आत्मसात करण्याची क्षमता ठेवत असतो. फक्त कमाईसाठी नाही तर व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी स्किल्स आजमावणे अत्यंत गरजेचे आहे. आपण नेहमी ऐकतो की माणूस आपल्या आयुष्याच्या शेवटर्यंत कायम विद्यार्थी असतो. म्हणूनच सतत शिकत राहणे आणि बदलत्या काळानुसार स्वतःला नेहमी अपडेट ठेवणे ही भविष्याची गरज आहे.
नोकरी किंवा व्यवसाय करत असताना कोणत्या क्षणी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज भासू शकते हे सांगता येत नाही. असे म्हटले जाते कि, बदलत्या वातावरणानुसार डायनासोर स्वतःला जुळवून घेऊ शकले नाहीत म्हणून ते नामशेष झाले. कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवले तर काळ कोणताही आणि कसाही असला तरी आपण त्यामध्ये तग धरू शकू हे निर्विवाद सत्य आहे.
आणखी वाचा
- १० वी आणि १२ वी नंतर काय?
- Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी
- करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling
- करिअरची झेप अंतराळापर्यंत
Good