स्वतःच स्वतःचे नायक बना
एक उद्योजक म्हणून तुम्हाला मिळालेला आजवरचा सर्वात वाईट सल्ला कोणता होता? माझ्यासाठी तो होता, “स्वतः स्वतःचे बॉस बना. Be Your Own Boss.”
मी हा विचार माझ्या विशीत ऐकला होता आणि त्यानंतर स्वतःचा ‘बॉस’ बनण्यात मी बरीच वर्षे घालवली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मालक-कर्मचारी यांच्यातला संवाद मी स्वतःशीच करायचो. मी कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करायचो.
पण हा संवाद माझ्या एकट्यापुरता मर्यादित होता.
पुढे अनेक यशस्वी लोकांना भेटल्यावर माझ्या लक्षात आले की, यापैकी कुणीही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत नाही आहे. या सगळ्यांना एक गोष्टी पक्की ठाऊक आहे की, इतरांसाठी काम केल्यानेच यश प्राप्त होते. त्यामुळे त्यांनी आपापल्या परीने स्वतःचे बॉस निवडले होते.
काहीजण स्वतःच्या सहकाऱ्यांना बॉस मानत होते, तर काहीजण त्यांच्या ग्राहकांना. इतर काही त्यांच्या गुंतवणूकदारांना किंवा भागीदारांना. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती. हे सगळे लोक नेहमी प्रेरित असत, त्यांना जबाबदारीची जाणीव असे आणि त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जाई. ते जितके यशस्वी होत गेले, तितकेच जबाबदार होत गेले.
त्यामुळे जर तुम्ही अजूनही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते लगेच सोडून द्या, त्याऐवजी योग्य बॉस शोधण्याचा प्रयत्न करा. चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. ‘जे करावे लागते’ ते न करता, ‘जे करायला आवडते’ ते करण्याचा प्रयत्न करा. जो कोणता व्यवसाय कराल त्याची क्षितिजे विस्तारताना आपल्यामधील शक्यतांचा, क्षमतांचा वापर करा. स्वतःच स्वतःचे नायक बना…
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.