Warren Buffett Investment Rules: जगभरात एकापेक्षा एक श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, त्या सर्वांमध्ये उजवे ठरणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे वॉरेन बफे होय. बफे यांचा जन्म अमेरिकेतील नेब्रास्का येथे ३० ऑगस्ट, १९३० रोजी झाला. दिग्गज गुंंतवणूकदार आणि उद्योगपती असलेले बफे यांची गणना जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदारांमध्ये होते. त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल १२६ बिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट आणि प्रदीर्घ गुंतवणुकीचा ट्रॅक रेकॉर्डही आहे.
असे महान गुंतवणूकदार बफेंनी गुंतवणुकीशी संबंधित काही नियम सांगितले आहेत, ते जर प्रत्येक यशस्वी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाळले, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. कारण, बफेंनी सांगितलेले हे नियम मार्केटची कंडीशन बदलली तरी तितकेच शक्तिशाली राहतात. कोणते आहेत ते नियम जाणून घेऊयात…
नियम १- पैसे गमावू नका
वॉरन बफे (Warren Buffett) यांचा ‘पैसे गमावू नका’ हा नियम खूपच महत्त्वाचा आहे. खरं तर, बफे हे जोखीम न घेणारे गुंतवणूकदार आहेत. जगातील इतक्या मोठ्या गुंतवणूकदाराविषयी असं म्हणणे कदाचित विचित्र वाटू शकते. मात्र, पोर्टफोलियो सुरक्षा ही संपत्ती कमावण्याच्या मार्गाने टाकलेले पहिले पाऊल आहे.
नियम २- पहिला नियम विसरू नका
बफेंनी सांगितलेला दुसरा नियम हाच आहे की, कुठल्याही गुंतवणूकदाराने पहिला नियम विसरायचा नाही. हे कसे करायचे, हेदेखील बफे स्पष्ट करतात. ते असे की, शक्यतो बड्या कंपन्या जेव्हा जास्त सवलतीत ट्रेडिंग करतात, तेव्हा या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. ते असाही इशारा देतात की, तुमच्या भांडवलासोबत कधीही अनावश्यक जोखीम घेऊ नका.
नियम ३- नेहमी सुरक्षा मार्जिन ठेवा
एका कंपनीची फेअर व्हॅल्यू आणि बाजारातील व्हॅल्यूमध्ये अंतर आहे. जर फेअर व्हॅल्यूपेक्षा बाजार मूल्य कमी असले, तर सुरक्षा मार्जिन हे जास्त असते. हा नियम असे सांगतो की, तुम्हाला मार्केटविषयी कमी समज असेल तर, तुमचं सुरक्षा मार्जिन जास्त असावं.
नियम ४- चांगल्या वित्तीय कंपन्यांचा शोध घ्या
कंपनीच्या मूलभूत गोष्टी दाखवताना स्टॉकची किंमत थोडी कमी असू शकते. त्यामुळे बॅलेन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट तसेच नफा आणि तोट्याचे स्टेटमेंट यांसारख्या वित्तीय स्टेटमेंटच्या आधारे कमी मूल्यमापन केलेल्या कंपन्या शोधणे शक्य आहे.
नियम ५- चांगली कमाई करणाऱ्या कंपन्या शोधा
वॉरन बफे 5 ते 10 वर्षांच्या कालावधीतील कमाईचा मजबूत इतिहास असलेल्या कंपन्यांचा शोध घेतात. त्यांना तिमाहीत होणाऱ्या कमाईशी काहीही चिंता नाहीये. कारण त्यांचा असा विश्वास आहे की, हा अल्पकालीन दृष्टीकोन एक वाईट वृत्ती आहे. कमी नफा आणि थोडीफार कमाई असलेली कंपनी, जी फक्त दोन वर्षांची आहे, ती बफेट यांच्या पोर्टफोलिओमध्ये येऊ शकणार नाही.
या लेखाचा शेवट करताना तुम्हाला आणखी एक बोनस नियम सांगू की, बफेंच्या गुंतवणूक तत्त्वांतील मुख्य तत्व हे दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तुम्ही जितका जास्त काळ चांगले स्टॉक्स होल्ड करून ठेवाल, तितके तुमचे रिटर्न्स चांगले असतील. हे अल्प-मुदतीच्या अस्थिरतेच्या समस्या दूर करते ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार उच्च पातळीवर खरेदी करतात आणि कमी विक्री करतात.
अशाप्रकारे, तुम्ही जर हे नियम वापरून योग्य गुंतवणूक केली, तर तुम्हाला नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.