जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम
जगामध्ये व भारतामध्ये काही विशिष्ट उदा. जैन, मारवाडी, सिंधी, गुजराती, ज्यू, पारशी, बोहरी ह्या आणि अशा मोजक्या जातीजमाती का सतत श्रीमंत व उद्योगात यशस्वी होत गेल्या आहेत? तर त्यांच्या जीवनात चार गोष्टी प्रामुख्याने दिसतात. त्या जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आचरणात आणल्यास, तुम्हीही यशस्वी व कोट्याधीश झाल्याशिवाय राहणार नाही.
पहिलं जीभेवर साखर :
सतत गोड बोलणे, मृदुभाषा, आलेल्यांचे हसतमुखाने स्वागत, चहापान वगैरे इत्यादींमुळे माणसाचे संपर्क वाढतात, संबंध सलोख्याचे बनतात. गोड, मृदु व समजूतदारपणे बोलणार्याबरोबर ग्राहकांना व्यवहार करावासा वाटतो. गोड बोलणार्या दुकानदाराचे दुकान इतरांपेक्षा निश्चित अधिक चालते. गुड मॉर्निंग, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी बर्थडे, अभिनंदन असे प्रशंसेचे उद्गार काढण्यास किंवा तसा एखादा व्हॉटसअप मेसेज पाठवण्यास काय तोटा होतो? मग गोड बोलण्याची सवय लावून घ्या ना! सतत उद्धट भाषा, शिवीगाळ, वादविवाद, चिडचिड अशा प्रकारच्या वागण्याने माणूस कधीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही.
दुसरी डोक्यावर बर्फ :
उद्योग तर सोडा, पण आता सर्वसामान्य जीवनसुध्दा प्रचंड तणावाचे झाले आहे. आयुष्यात येणार्या ताणतणावाच्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी डोके अतिशय शांत असणे महत्वाचे आहे. मोबाईल तापला की हँग होतो, तसे डोके गरम झाले की बुध्दी चालत नाही आणि बुध्दी चालायची बंद झाली झाली की सगळं संपलं. तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवूनच जीवनात व व्यवसायात वावरले पाहिजे, तरच तुमची आयुष्यात प्रगती होत जाईल. तापट स्वभावाच्या माणसाचा काही दिवसात सत्यानाश होऊन तो शेवटी मागे पडून गरिबीच्या खाईत लोटला जातो.
तिसरी मेंदूत आयडिया :
आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी केवळ पारंपारिक पध्दतीने जगणे आता कालबाह्य झाले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत नवीन नवीन आयडियांचा विचार केला पाहिजे. कोणत्या प्रोडक्ट, सेवांमध्ये चांगला फायदा आहे, भविष्यात कोणत्या जागांचे भाव वाढतील, मार्केटिंग करताना काय करावे म्हणजे फायदा वाढेल, कोणत्या व्यक्तीशी संपर्क कुठे व कसा साधावा म्हणजे आपणास फायदा होईल, कोणत्या कंपनीची एजन्सी घ्यावी म्हणजे फायदा होईल, ई-कॉमर्स, इंटरनेटच्या माध्यमातून काय करता येईल का? असे मेंदूत सतत आयडियांचे मंथन सुरू पाहिजे.
चौथी हातात काम :
श्रीमंत होणार्या व प्रचंड यशस्वी होणार्या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ६ वाजता उठल्यापासून ते रात्री १२ वाजता झोपेपर्यंत त्यांच्या हाताला काही-ना-काही काम असते. आपला व्यवसाय, व्यवहाराचा व्यापच येवढा पाहिजे, की तुम्हाला सतत काम असले पाहिजे. प्रत्येक यशस्वी उद्योजक एकाच वेळी १० हून अधिक वेगवेगळे व्यवसाय सांभाळतात. हातात काम नसणे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मृत व्यक्तीचे लक्षण आहे. ज्यांच्या हाताला आज काम नाही म्हणजे, तो लवकरच मार्केट बाहेर पडून होऊन मागे पडेल. काम नसेल तर काम शोधून काढले पाहिजे :
तेव्हा तुम्हीसुद्धा ह्या चार गोष्टी लक्षात घेऊन स्वत:चा व्यवसाय लवकर सुरू करतील व जीवनात प्रचंड यशस्वी व्हा या शुभेच्छा… ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.