व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात फिरुन माहिती घेतल्यानंतर, वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणांकडून त्यांच्याशी चर्चा केल्यावर, तसेच विविध ठिकाणच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व इतर सर्व प्रकारच्या परिस्थितीचा चिकित्सक अभ्यास केल्यावर सदर लेखमालिका सुरु करत आहोत. तरुणांच्या मनात उठणारे प्रश्नांचे वादळ, प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर येणाऱ्या अडचणी व अडचणींबरोबरची हतबलता, त्यावर उपाय न शोधता येणे, नोकरी करावा की व्यवसाय?
असा पेच पडणे व त्याचे योग्य उत्तर न मिळणे, व्यवसाय करायचा तर कोणता करायचा? त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे? त्याचे मार्केटिंग कसे करायचे? यासारखे व इतर अनेक प्रश्न पडणारे तरुणांना पडत असतात.
या प्रश्नात मुख्य प्रवाहाबाहेरच्या इतर काही प्रश्नांचीदेखील भर पडत असते. ते प्रश्न म्हणजे, शिक्षणासाठी आयुष्याची २०-२२ वर्षे घालवल्यानंतर ऐन उमेदीच्या काळात पैसा कमावण्यासाठी घरुन येणारा दबाव किंवा मजबूरी, पाठीमागच्या पिढीने करुन ठेवलेले कर्ज (मग ते आपल्या शिक्षणासाठी असो की अजून कोणत्या कारणाने) कसे फेडायचे? त्यानंतर समाजातील काही लोक विचारतात लग्न कधी करणार? लग्न केले तर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन लग्नाआधीच व्यवसाय स्थिरस्थावर करण्यासाठीची धावपळ व कमीअधिक महत्त्वाचे अजून काही प्रश्न सोडवता सोडवता कोणता प्रश्न कधी सोडवायचा? हाही एक नवीन प्रश्न.
उत्तर देणारे कुणी नसते. आपल्या वाट्याला येते मग गळचेपी. पाठीमागची पिढी नव्या वाटेवरुन चालायला विरोध करते, तर आपल्या सोबत असणारी नवी पिढी अनुभवाअभावी व थोड्याशा अधीरपणामुळे काही ठिकाणी चुकते. ह्या चुका टाळता याव्यात म्हणून करता येणाऱ्या उपाययोजना या लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकशित करू ज्या व्यवसायाच्या वाटेवर चालताना मार्गदर्शक ठरतील.
👇 अनुक्रमणिका
👉 भाग १ – मानसिकता व पूर्वतयारी
१. व्यवसाय की नोकरी?
२. व्यवसायच का?
३. सुरुवात करण्यापूर्वी काय?
४. मानसिकता
५. व्यवसाय कोणता?
६. कार्यक्षेत्र कसे ठरवावे?
७. बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?
८. कुटूंबातील व्यक्तींचा पाठिंबा की विरोध? व उपाय
९. अनुभवाची गरज आहे का?
👉 भाग २ – प्रत्यक्ष सुरुवात, भांडवली उभारणी व सरकारी परवानग्या
१०. कशी करावी सुरवात?
११. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? व्यवसाय प्रकारानुसार
१२. भांडवल कसे उभे करावे?
१३. भांडवल उभे करताना तारण नसल्यास काय?
१४. भांडवलासाठी घेतलेले पैसे कसे परत करणार?
१५. कोणत्या परवानग्या लागतील? व्यवसाय प्रकारानुसार
१६. सरकारी परवानग्यांचा होणारा फायदा काय?
१७. कशा मिळवाव्यात परवानग्या?
👉 भाग ३ – उत्पादने, मार्केटिंग व प्रत्यक्ष नफा
१८. उत्पादन करण्यापूर्वी काय तयारी करावी?
१९. प्रत्यक्ष उत्पादन कसे करावे?
२०. आकर्षक मांडणी व लागल्यास पॅकेजिंग कसे करावे?
२१. मार्केटिंगसाठी लागणारे सोपे उपाय
२२. सेल्स करताना घ्यावयाची काळजी
२३. अडचणीच्या काळात व्यवसायात टिकून कसे रहावे?
२४. नेहमी उत्साहात काम करण्याची कला
२५. प्रत्यक्ष नफा मिळवण्याची प्रक्रिया
👉 भाग ४ – करप्रणाली, व्यवसाय वृध्दी व ब्रँड बनवणे
२६. भरावे लागणारे कर व त्याचे फायदे तोटे
२७. व्यवसाय वृध्दीची गरज
२८. व्यवसाय वृध्दीसाठी उचलावी लागणारी पावले
२९. ब्रँडचे महत्त्व व गरज
३०. ब्रँड निर्मितीचे मार्ग व यशस्वी उद्योग चिरकाल टिकवताना
३१. व्यवसायातील स्पर्धा व त्यातून निर्माण होणारे अडथळे
३२. व्यवसायातील स्पर्धा व त्यात टिकून राहण्याची कला
याव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग, व्यवसाय नोंदणी व प्रकार आणि इतर विषय आवश्यकतेनुसार ठरवण्यात येतील.