आर्थिकआर्थिक नियोजन

1 जूनपासून बदलले 6 मोठे नियम

मे महिन्यातील कडक उष्णतेच्या लाटेनंतर आणि महागाईच्या भडक्यानंतर आता जून महिना सुरू झाला आहे. १ जूनच्या पहिल्याच तारखेला नियमांत झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांच्या खिशाची धग नक्कीच वाढवली आहे. दर महिन्याच्या १ तारखेला सरकारी तेल कंपन्यांपासून ते बँकांपर्यंत अनेक संस्था आपल्या नियमांमध्ये सुधारणा करतात. यावेळेससुद्धा १ जून २०२६ पासून गॅस सिलेंडरपासून ते ड्रायव्हिंग लायसन्स, बँकिंग आणि थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. नवीन महिन्याची सुरुवात होताच आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांमुळे तुमचे घरगुती बजेट विस्कटणार की तुम्हाला दिलासा मिळणार? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया…

१.कमर्शियल LPG सिलेंडर महागला

तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. यासोबतच ५ किलोच्या LPG सिलेंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक LPG सिलिंडरचा दर 42 रुपयांनी वाढला असून 5 किलोच्या मिनी सिलिंडरचा दरही 11 रुपयांनी महाग झाला आहे. अशाप्रक्रारे मुंबईत आता 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. तर 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 912.50 रुपयांवर स्थिर राहिली असून पाच किलोचा LPG मिनी सिलिंडर 339 रुपयांना मिळत आहे. या वाढीचा थेट फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांना बसू शकतो.  

२.बँकिंग क्षेत्रातील बदल-क्रेडिट कार्ड आणि चार्जेस (Banking & Credit Card Changes)

जर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण काही बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट्स (Reward Points) आणि फी स्ट्रक्चरमध्ये बदल केले आहेत.विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त युटिलिटी बिल उदा. वीज बिल, पाणी बिल भरल्यास आता अतिरिक्त शुल्क मोजावे लागू शकते. काही बँकांनी फ्री डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज ॲक्सेसच्या नियमांमध्येही कडक बदल केले आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

३.टॅक्स आणि आधार अपडेट संदर्भातील डेडलाईन (Aadhaar & Tax Updates)

जून महिना हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक करविषयक (Tax) कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत असते. तसेच, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधाही या महिन्यात संपत आहे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड गेल्या १० वर्षांत अपडेट केले नसेल, तर ते त्वरित अपडेट करून घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यानंतर तुम्हाला शुल्क द्यावे लागेल.

४.ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम कडक (New Driving License Rules)

RTO कडून आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, आता वाहन चालवण्याची चाचणी (Driving Test) देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. सरकारमान्य खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चाचणी देऊनही आता लायसन्स मिळवता येणार आहे. परंतु, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास आता पालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तब्बल २५,००० रुपयांचा दंड आणि पालकांना तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

५. रेल्वे तिकिटांचे नियम आणि नवीन वेळापत्रक (Indian Railways New Rules)

भारतीय रेल्वे जून 2026 मध्ये मोठा रेल्वे ब्लॉक लागू करणार आहे ज्यामुळे अंदाजे 77 गाड्या रद्द होतील आणि इतर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल होईल. भारतीय रेल्वेच्या या बदलांचा परिणाम पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा यासह अनेक राज्यांवर होईल. अनेक सुपरफास्ट गाड्यांच्या वेळा आणि मार्गांमध्येही बदल केले आहेत. तसेच, तिकीट बुकिंग आणि रिफंडच्या नियमांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन डिजिटल प्रणाली अधिक सक्रिय करण्यात आली आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या ट्रेनची वेळ तपासून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

६. ट्रॅफिक फाईन आणि सुरक्षिततेचे नियम

केवळ लायसन्सच नाही, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे आणि सिग्नल तोडणे यासारख्या गुन्ह्यांसाठी आता तंत्रज्ञानाचा (AI कॅमेरे) वापर करून थेट ई-चलान फाडले जाणार आहे. वाहतूक शिस्त लागावी आणि अपघात कमी व्हावेत हा यामागील मुख्य उद्देश आहे.

सर्वसामान्यांनी आता काय करावे?

१ जूनपासून लागू झालेले हे बदल एका बाजूला डिजिटल पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. बदलत्या नियमांची वेळीच माहिती असणे हाच आर्थिक नुकसान टाळण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. म्हणून आता प्रत्येकाने गॅस आणि इतर सेवांच्या किमती बदलल्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती बजेटचे नियोजन करणे गरजेचे आहे. तुमच्या बँकेकडून आलेल्या ईमेल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. क्रेडिट कार्डचे नवीन नियम वाचून घ्या. घरात अल्पवयीन मुले असतील, तर त्यांच्या हातात चुकूनही वाहनांची चावी देऊ नका. आरटीओचे नियम आता पूर्वीपेक्षा खूप कडक झाले आहेत. त्यामुळे जागरूक राहा, नियमांचे पालन करा आणि आपले आर्थिक बजेट सुरक्षित ठेवा! या बदलेल्या नियमांवर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button