Sugar Price Hike: साखर अचानक महागली… पण का?
साखरेच्या वाढत्या किमतींमुळे सध्या अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे — साखर अचानक महागली कशी? यामागे इथेनॉल कारणीभूत आहे का? प्रत्यक्षात साखरेच्या दरवाढीमागे एकच कारण नसून अनेक घटक एकाच वेळी परिणाम करत आहेत.
कमी उत्पादनाचा थेट फटका
2025-26 मध्ये 343 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु हे उत्पादन 306 लाख टनांपर्यंत खाली येण्याची भीती आहे. म्हणजे जवळपास 37 लाख टन साखर कमी.
Sugar Price Hike: ऊसावरील कीड-रोग आणि काही भागांतील अतिवृष्टी याचा थेट फटका उत्पादनाला बसला आहे.
सणांचा Season सुरू झाल्यामुळे मागणी वाढली
ऑगस्टपासून गणपती, दसरा आणि दिवाळीची तयारी सुरू होते. मिठाई दुकाने, बेकरी आणि घरगुती वापरासाठी साखरेची मागणी गगनाला भिडते.
बाजारात पुरवठा कमी आणि मागणी जास्त असेल, तर भाव वाढणे स्वाभाविक ठरते.
भारतातच साखर महागली?
नाही.
Sugar Price Hike: जागतिक बाजारातही साखरेच्या दरात 16% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. भारतामध्येही 20 ऑगस्टला साखरेचा भाव ₹55.70/kg होता. काही ठिकाणी ₹70-75 च्या वर दर गेले आहेत.
Global Market हललं की त्याचा परिणाम आपल्यावरही होतो.
“पण देशात साखर आहे ना?”
हो… साखर संपलेली नाही!
नवीन हंगाम सुरू होईपर्यंत पुरेसा Stock असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
मग भाव का वाढतोय?
कारण बाजारात फक्त माल किती आहे हे महत्त्वाचं नसतं. लोकांना पुढे माल कमी पडेल असं वाटतंय का? साठेबाजी होतेय का? मागणी वाढतेय का? या सगळ्याचा भावावर परिणाम होतो.
साखरेचा भाव कोण ठरवतं?
एक व्यक्ती नाही. एक कंपनी नाही. थेट सरकारही नाही.
सरकार ऊसासाठी FRP ठरवतं.
2026-27 साठी FRP: ₹365/क्विंटल
पण FRP म्हणजे साखरेचा दुकानातील भाव नाही.
उत्पादन खर्च + मागणी/पुरवठा + वाहतूक + व्यापारी मार्जिन + बाजारातील परिस्थिती या सगळ्यांचा अंतिम भावावर परिणाम होतो.
मग इथेनॉलमुळे साखर महागली?
फक्त इथेनॉलमुळे नाही!
उलट इथेनॉलसाठी वळवली जाणारी साखर 2022-23 मधील 12% वरून 2025-26 मध्ये 9% पर्यंत खाली आली आहे.
खरी कारणे म्हणजे कमी उत्पादन + सणांची वाढती मागणी + जागतिक तेजी. या तिहेरी फॅक्टरमुळे भाव वाढले आहेत.
यावर पर्याय काय?
आता सरकारने 10 लाख टन Raw Sugar Duty-Free Import करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 ऑगस्टपासून व्यापाऱ्यांसाठी 400 टनांची Stock Limit लागू करण्यात आली.
आणि ऑक्टोबरपासून गाळप लवकर सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यामुळे सप्लाय वाढला, तर दर कमी होऊ शकतात.
तुमच्या शहरात आज साखर किती रुपये किलो आहे?
Comment मध्ये तुमचं शहर आणि भाव सांगा.


