← मुख्य पानावर परत जा
मुख्य पानआर्थिक घडामोडीआर्थिकस्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!
आर्थिक

स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!

ना
नवी अर्थक्रांती
|
२६ मे, २०२६
|
३ मिनिटे वाचन
|
१,५२० वाचले
स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!

स्मार्ट वुमन ती नाही जी फक्त पैसे खर्च करते, तर ती आहे जी पैशाने पैसा बनवायला शिकते! महिला मंडळींनो जर तुम्हालाही भविष्यात पैशांची चिंता न करता जगायचं असेल, तर आजच या फायनान्शियल टिप्स फॉलो करा.

सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आधी बचत, मग खर्च. अनेकदा आपण महिनाभरातून उरलेले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नियम उलटा करायला हवा. पगार झाला किंवा हातात घर खर्चाचे पैसे आले की, आधी किमान २० ते ३० टक्के रक्कम बचतीसाठी बाजूला काढून उरलेल्या पैशातच महिन्याचे बजेट चालवायला शिकले पाहिजे. यासाठी ५०:३०:२० चा सुवर्ण नियम खूप फायदेशीर ठरतो. ज्यामध्ये ५०% रक्कम गरजांसाठी, ३०% इच्छांसाठी आणि २०% रक्कम भविष्यातील गुंतवणुकीसाठी वापरली जाते.

पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे फक्त कपाटात किंवा बँकेच्या साध्या खात्यात ठेवून वाढत नाहीत, कारण महागाईमुळे त्यांची किंमत कमी होत जाते. म्हणूनच त्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तुम्ही दरमहा अगदी लहान रकमेपासून म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी (SIP) सुरू करू शकता किंवा बँकेत आरडी (RD) चालू करू शकता. याशिवाय महिलांसाठी असलेल्या विशेष सरकारी योजना, जसे की ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ किंवा पीपीएफ (PPF) चा नक्की फायदा घ्या. महिलांनी शॉपिंग करतानाही थोडे स्मार्ट बनले पाहिजे. अनेकदा सेल लागलाय म्हणून आपण नको असलेल्या गोष्टी खरेदी करतो, ज्याला ‘इम्पल्स बाइंग’ म्हणतात. कोणतीही मोठी खरेदी करताना स्वतःला २४ तास द्या आणि विचार करा की ती वस्तू खरंच गरजेची आहे का? तसेच ऑनलाईन शॉपिंग करताना कूपन कोड्स आणि कॅशबॅकचा आवर्जून वापर करा.

शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे स्वतःचा Emergency Fund तयार ठेवा. संकट कधीही सांगून येत नाही, त्यामुळे किमान ६ महिन्यांच्या घर खर्चाइतकी रक्कम अशा ठिकाणी सुरक्षित ठेवा, ज्याला अत्यंत गरजेच्या वेळीच हात लावला जाईल. थोडक्यात सांगायचे तर, पैशाची बचत करणे म्हणजे कंजूषपणा नसून ते तुमच्या सुरक्षित भविष्याचे भांडवल आहे. आज केलेली हीच छोटीशी बचत आणि योग्य गुंतवणूक उद्या तुम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवू शकते. काय मग महिला मंडळी यापैकी तुम्ही कोणती टिप्स फॉलो करणार आहात? कमेंट करून नक्की सांगा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा!

आणखी वाचा:

संबंधित लेख (Related Articles)

शेअर मार्केट प्राथमिक ज्ञान: नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करावी?
आर्थिक नियोजन

शेअर मार्केट प्राथमिक ज्ञान: नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करावी?

२४ जून २०२६१ मि.
वाचा
स्मार्टफोन सुरक्षा: 5G नेटवर्क वापरताना मोबाईल मधील गुप्त माहिती लीक होण्यापासून कशी वाचवावी?
विज्ञानविश्व

स्मार्टफोन सुरक्षा: 5G नेटवर्क वापरताना मोबाईल मधील गुप्त माहिती लीक होण्यापासून कशी वाचवावी?

२८ जून २०२६१ मि.
वाचा
उद्योजकता विशेष: घरगुती मसाल्यांच्या व्यवसायातून गृहिणीने उभी केली कोट्यवधींची उलाढाल
बिझनेस स्टोरीज

उद्योजकता विशेष: घरगुती मसाल्यांच्या व्यवसायातून गृहिणीने उभी केली कोट्यवधींची उलाढाल

१ जुलै २०२६१ मि.
वाचा
व्यवसाय आयडिया: कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे ५ उत्तम ग्रामीण उद्योग
बिझनेस टिप्स

व्यवसाय आयडिया: कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे ५ उत्तम ग्रामीण उद्योग

३० जून २०२६१ मि.
वाचा
स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही! - नवी अर्थक्रांती