← मुख्य पानावर परत जा
मुख्य पानउद्योजकताउद्योजकता विजडमजीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा
उद्योजकता विजडम

जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा

नवी अर्थक्रांतीनवी अर्थक्रांती
|
४ डिसेंबर, २०२३
|
१,५२० वाचले
जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा

गाडी वेगाने कशामुळे धावते? असा प्रश्न एका व्याख्यानात श्रोत्यांना केला, तेव्हा अनेकांनी इंजिन, पेट्रोल, ॲक्सलरेटर, चाक अशी उत्तरे दिली. ही उत्तरं बरोबर आहेत. परंतु मित्रहो थोडा वेळ विचार करा, जर समजा गाडीला ब्रेकच नसता, तर तुम्हाला गाडी खूप लांब चालविता आली असती का? तर नाही. वेगावर नियंत्रण ठेवता येण्यामुळेच जगातील कोणतीही गोष्ट किंवा वाहन चालते. ज्या गोष्टीला थांबण्यासाठी ब्रेक नाही अशा गोष्टी वादळाप्रमाणे सुसाट जातात व धडकून नष्ट होतात. जशी आकाशातून पडलेली उल्का किंवा नियंत्रण हरवून बसलेलं एखादं विमान. गोष्टी थांबल्या आणि योग्य ठिकाणी थांबल्या तर फायद्याच्या असतात.

व्यवसाय करत असताना कधी किती वेगाने जायचं, कधी ब्रेक मारून थांबायचं हे कळायला हवं. सीसीडी ब्रॅंड आपल्या कॅफेच्या शाखा धडाधड उघडत गेला. पण वेगाने पुढे जायच्या नशेत आपल्या हातून काय चुका होत आहेत याचा अंदाज न आल्याने एक दिवस याच करोडोंची उलाढाल करणाऱ्या ब्रॅंडच्या मालकाला आत्महत्या करायची वेळ आली. थांबल्याने, हळूहळू चालल्याने फरक पडत नाही. फक्त कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि किती वेळ थांबायचं याचं विजडम जवळ हवं…  

तुम्ही असा ब्रेक घेता का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

हा लेख विडीयो मध्ये पहा
📤हा लेख शेअर करा

संबंधित लेख (Related Articles)

उद्योजकता विशेष: घरगुती मसाल्यांच्या व्यवसायातून गृहिणीने उभी केली कोट्यवधींची उलाढाल
बिझनेस स्टोरीज

उद्योजकता विशेष: घरगुती मसाल्यांच्या व्यवसायातून गृहिणीने उभी केली कोट्यवधींची उलाढाल

१ जुलै २०२६१ मि.
वाचा
निर्यात उद्योग: कृषी माल विदेशात कसा निर्यात करावा? जाणून घ्या परवाना मिळवण्याची प्रक्रिया
टुरिझम

निर्यात उद्योग: कृषी माल विदेशात कसा निर्यात करावा? जाणून घ्या परवाना मिळवण्याची प्रक्रिया

३० जून २०२६१ मि.
वाचा
शून्यातून विश्व निर्माण करणारा मराठी तरुण; सेंद्रिय खतांच्या व्यवसायातून मिळवली यश
जिंकलंस भावा!

शून्यातून विश्व निर्माण करणारा मराठी तरुण; सेंद्रिय खतांच्या व्यवसायातून मिळवली यश

१ जुलै २०२६१ मि.
वाचा
सेंद्रिय शेती पद्धती: रासायनिक खतांऐवजी घरगुष सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता सुधारली
आधुनिक शेती

सेंद्रिय शेती पद्धती: रासायनिक खतांऐवजी घरगुष सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता सुधारली

२२ मार्च २०२६१ मि.
वाचा