← मुख्य पानावर परत जा
मुख्य पानआर्थिक घडामोडीआर्थिकलोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..
आर्थिक

लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

नवी अर्थक्रांतीनवी अर्थक्रांती
|
८ जून, २०२६
|
१,५२० वाचले
लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

EMI: १ तारखेला पगार होतो आणि ५ तारीख येईपर्यंत बँक अकाउंट रिकामं होत. EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि लोनच्या हप्त्यांमध्ये तुमचाही पगार गायब होतोय? तर मित्रांनो, कर्ज घेणं चुकीचं नाही, पण कर्जाच्या डेथ ट्रॅपमध्ये अडकणं भयंकर आहे. आज मी तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे जगप्रसिद्ध २ भन्नाट उपाय सांगणार आहे, जे तुमचे बँक अकाउंट पुन्हा जिवंत करतील.

पहिली पद्धत आहे डेट स्नोबॉल (Debt Snowball Method).


यामध्ये व्याजाचा विचार बाजूला ठेवा. तुमच्या सर्व कर्जांची एक लिस्ट बनवा त्यामध्ये सर्वात आधी सर्वात लहान कर्ज पूर्ण ताकदीने फेडून टाका. जेव्हा पहिलं छोटं कर्ज संपतं ना, तेव्हा मिळणारा मानसिक आनंद आणि आत्मविश्वास पुढची मोठी कर्जं संपवायला ऊर्जा देतो. जसा बर्फाचा गोळा डोंगरावरून खाली येताना मोठा होतो, तसाच तुमचा कर्ज फेडण्याचा आत्मविश्वास वाढतो.

दुसरी पद्धत आहे डेट एव्हलांच (Debt Avalanche Method).


जर तुम्हाला गणिताची भाषा समजते आणि हुशारीने पैसे वाचवायचे असतील, तर ही पद्धत तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये सर्वात आधी ज्या कर्जावर सर्वात जास्त व्याज आहे, उदा. क्रेडिट कार्ड लोन ज्यावर वार्षिक ३६% ते ४२% व्याज असतं, ते आधी संपवा. यामुळे तुमचं व्याजात जाणारं हजारो रुपयांचं नुकसान तात्काळ थांबतं. हे संपलं की, त्यापेक्षा कमी व्याज असलेलं कर्ज टार्गेट करा आणि ते संपवा.

EMI: थोडक्यात सांगायचं तर पहिली पद्धत तुम्हाला मानसिक समाधान देते, तर दुसरी पद्धत तुमचे खरे पैसे वाचवते. फायनान्शियल एक्सपर्ट्सच्या मते, ८०% लोक स्नोबॉल पद्धतीमुळे कर्जातून लवकर बाहेर पडतात कारण माणसाला रिझल्ट्स लवकर हवे असतात. तुम्हाला या दोन्हींपैकी कोणती पद्धत जास्त प्रॅक्टिकल वाटते? स्नोबॉल की एव्हलांच? कमेंट करून नक्की सांगा.

आणखी वाचा :

📤हा लेख शेअर करा

संबंधित लेख (Related Articles)

शेअर मार्केट प्राथमिक ज्ञान: नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करावी?
आर्थिक नियोजन

शेअर मार्केट प्राथमिक ज्ञान: नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करावी?

२४ जून २०२६१ मि.
वाचा
गुंतवणूक नियोजन: सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे डिजिटल मार्ग (Sovereign Gold Bonds)
टिप्स

गुंतवणूक नियोजन: सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे डिजिटल मार्ग (Sovereign Gold Bonds)

२७ जून २०२६१ मि.
वाचा
इन्शुरन्स मार्गदर्शक: टर्म लाइफ इन्शुरन्स का महत्वाचा आहे? निवडताना या चुका टाळा
अर्थजगत

इन्शुरन्स मार्गदर्शक: टर्म लाइफ इन्शुरन्स का महत्वाचा आहे? निवडताना या चुका टाळा

२६ जून २०२६१ मि.
वाचा
पगारदार लोकांसाठी टॅक्स वाचवण्याचे ५ सोपे मार्ग; कलम 80C च्या पलीकडे जाऊन करा नियोजन
अर्थेसाक्षर व्हा

पगारदार लोकांसाठी टॅक्स वाचवण्याचे ५ सोपे मार्ग; कलम 80C च्या पलीकडे जाऊन करा नियोजन

२५ जून २०२६१ मि.
वाचा