Shiv Nadar Success Story in Marathi: मित्रांनो, आपण रोज किती रुपये खर्च करतो? १०० रुपये, ५०० रुपये किंवा फार-फार तर हजार रुपये? आणि ते करतानाही आपण दहा वेळा विचार करतो, बरोबर ना? पण तुम्हाला माहितीये का? आपल्याच देशात एक असा उद्योगपती आहे, जो रोज ७ कोटी रुपये खर्च करतो. रोजचा एवढा खर्च ते स्वतःच्या चैनीसाठी, फिरण्यासाठी किंवा आलिशान गाड्यांवर मुळीच करत नाहीत. हा पूर्ण पैसा जातो गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी.
आहे की नाही थक्क करणारी गोष्ट? आपण बोलतोय भारताचे सर्वात मोठे दानशूर शिव नादर यांच्याबद्दल.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा श्रीमंत कसा झाला? ज्यांनी दिल्लीच्या एका छोट्याशा गॅरेजमधून कामाला सुरुवात केली, त्यांनी देशातील एवढी मोठी IT कंपनी कशी उभी केली? चला, आज त्यांच्याच संघर्षाची आणि यशाची तुम्हाला माहित नसलेली गोष्ट थोडक्यात जाणून घेऊयात…
तामिळनाडू ते दिल्ली प्रवास
शिव नादर यांचा जन्म 14 जुलै 1945 रोजी तामिळनाडूमध्ये झाला.
इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर त्यांनी एका चांगल्या कंपनीत नोकरी सुरू केली.
पण स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याची तीव्र इच्छा मनात होती. याच इच्छेने त्यांना दिल्लीला आणले.
गॅरेजमधून सुरुवात!
Shiv Nadar Success Story in Marathi: 1976 मध्ये शिव नादर यांनी आपल्या काही मित्रांसोबत दिल्लीतील एका छोट्या गॅरेजमध्ये HCL कंपनी सुरू केली.
सुरुवातीला कंपनीने कॉम्प्युटरचे पार्ट बनवण्यावर लक्ष दिले.
भारतात कॉम्प्युटर तंत्रज्ञान घराघरात पोहोचवणे, हे त्यांचे स्वप्न होते.
अडचणींवर मात आणि मोठी झेप
सुरुवातीला पैशांची नड आणि बाजारातील मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा, अशा अनेक अडचणी आल्या.
पण शिव नादर मागे हटले नाहीत. त्यांनी 1990 च्या काळात सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठी झेप घेतली.
आज HCL कंपनी जगातील 60 देशांमध्ये पसरली असून, त्यात २ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.
जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान
Shiv Nadar Success Story in Marathi: आज HCL कंपनीची एकूण किंमत तब्बल 4,60,00 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
त्यांच्या या मोठ्या कामासाठी भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
एका गॅरेजमधून सुरू झालेला व्यवसाय आज जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गणला जातो.
भारतातील सर्वात मोठे ‘दानशूर’
शिव नादर हे फक्त पैसे कमवणारे व्यावसायिक नाहीत, तर ते देशातील सर्वात मोठे दानशूर आहेत.
त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून गरिबांसाठी मोफत शाळा आणि कॉलेजेस चालवली जातात.
त्यांनी गेल्या वर्षात 2,700 कोटींपेक्षा जास्त दान केले, म्हणजेच रोज सरासरी 7.4 कोटी रुपयांचे दान!
मुलीकडे सोपवली जबाबदारी
Shiv Nadar Success Story in Marathi: 2020 मध्ये शिव नादर यांनी कंपनीच्या मुख्य पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी आपली मुलगी रोशनी नादर यांच्याकडे कंपनीची सर्व सूत्रे सोपवली.
रोशनी नादर या HCL कंपनीच्या पहिल्या महिला चेअरमन बनल्या.
एका गॅरेजमधून सुरुवात करून अब्जावधींची कंपनी उभी करणे आणि कमावलेला पैसा समाजासाठी खर्च करणे, हा प्रवास थक्क करणारा आहे.
तुम्हाला शिव नादर यांचा हा प्रवास कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!

