← मुख्य पानावर परत जा
मुख्य पानप्रेरणादायी कथाप्रेरणादायी5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य
प्रेरणादायी

5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

नवी अर्थक्रांतीनवी अर्थक्रांती
|
६ जून, २०२६
|
१,५२० वाचले
5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

5 Successful Habits: जर मी हे करू शकतो, तर मी ते केलंच पाहिजे..

स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, वॉरेन बफेट, रतन टाटा, एलोन मस्क, नेल्सन मंडेला, ओप्राह विन्फ्रे, मदर तेरेसा, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  या आणि अशा अनेक व्यक्तींनी संपूर्ण मानवजातीवर त्यांच्या कार्यातून, कर्तृत्वातून खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. या सर्वांनी त्यांच्या परीने मानवतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रांनो जर तुम्ही स्व-विकास साधण्याचा प्रयत्न केला असेल, स्वत:ला घडवण्याचा प्रयत्न केला असेल, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे, “आपण जे विचार करतो, तेच विचार प्रत्यक्षात येतात”. मग हे असामान्य लोक नक्की कसा विचार करतात ज्यामुळे ते यशस्वी होतात ? सामान्य लोकांपेक्षा कोणत्या वेगळ्या गोष्टी हे लोक करतात ज्यामुळे मोठा बदल घडून येतो ?

असामान्य लोकं नेहमीच समस्या सोडवण्याच्या वेगळ्या मार्गांचा आणि वेगळ्या पद्धतींचा शोध घेतात, नेहमीच्या साचेबद्ध विचारांमध्ये ते अडकत नाहीत आणि प्रत्येक संधी आणि आव्हानं नवीन दृष्टिकोनातून, वेगळ्या विचारातून  पाहतात.

लेखक शिव खेरा म्हणतात .. 

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 

आजच्या लेखात आपण असामान्य लोक सामान्य लोकांपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळे असतात पाहूया : 

1. कठोर मेहनत विरुद्ध मिळणारे यश :

कुठलीही कृती करण्यापूर्वी सामान्य लोकांची प्रवृत्ती असते की, ते फक्त काम करण्यावर लक्ष  देतात. त्यातून होणाऱ्या परिणामांचा फारसा विचार करत नाहीत.

टेस्ला कार रस्त्यावर आणण्यासाठी एलोन मस्कला अगणित अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. तसेच ओप्रा विन्प्रेला तिचा टीव्हीवरील कार्यक्रम प्रचंड यशस्वी करण्यासाठी बरीच दिव्यं पार करावी लागली. पण त्यांचं लक्ष त्यांच्या मेहनतीपेक्षा त्यातून मिळणाऱ्या यशाकडे होतं आणि म्हणून ते यशस्वी झाले. Result कडे आपण जर लक्ष दिलं तर हातून घडणारी कृती ही चांगलीच घडणार आहे. 

२. सकारात्मक दृष्टिकोन विरुद्ध नकारात्मक दृष्टिकोन :

एखादं छोटं-मोठं अपयश आलं की सामान्य लोक लगेच खचून जातात आणि नकारात्मक विचार करतात. स्वतःच्या परिस्थितीला, नशिबाला दोष देत बसतात. याउलट असामान्य लोक अशा छोट्या-मोठ्या अपयशांनी घाबरून जात नाहीत,जरी एखादी अडचण आली तरी ते शांतपणे त्यावर मार्ग काढतात ; पण कारण नसताना तक्रारींचा पाढा वाचत बसत नाही. अपयश जरी आलं तरी त्याला अनुभव समजून ते त्यांचं काम करत राहतात आणि शेवटी त्यांना हवा असणारा परिणाम साधतात. तक्रारींपेक्षा त्यांना सातत्य आणि चिकाटी कायम अधिक महत्त्वाची वाटते.

३. मीच का ? विरुद्ध मीच का नाही ? :

सामान्य लोक नेहमी विचार करतात की, “मीच का?”

सगळं दुखः, सगळा त्रास माझ्याच वाट्याला का ? अपयशाचा आणि नकारांचा सामना नेहमी मलाच का करावा लागतो ? जगात बदल घडवण्याची जबाबदारी मीच का उचलावी ?

याउलट असामान्य लोक विचार करतात, “मीच का नाही?”

या जगात काहीतरी नवीन जन्माला घालणारा पहिला माणूस मीच का असू नये? लोकांचं जगणं सुसह्य करणारी एखादी गोष्ट मी का निर्माण करू नये? संकटांचा सामना करून, त्यावर उपाय शोधून मी ते उपाय इतरांशी शेअर का करू नयेत ? जर मी हे करू शकतो, माझ्यात ती क्षमता आहे तर मी ते केलंच पाहिजे.

४. नाही विरुद्ध हो :

सामान्य लोकं एखाद्या गोष्टीला नकार देताना खूप विचार करतात की ती व्यक्ती माझ्या जवळची आहे, नात्यातील आहे, माझा मित्र आहे मी त्याच्या कामाला नाही कसं म्हणू..तो काय विचार करेल ..

या उलट असामान्य लोकं त्यांच्या तत्त्वाविरुद्ध, इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट होत असेल तर त्याला लगेच नकार देतात…. एखादी गोष्ट करण्याची त्यांची इच्छा नसेल किंवा त्यांना ते जमणार नसेल तर ते विनाकारण जबाबदारी घेत नाहीत

५.  उद्या विरुद्ध आज :

सामान्य लोक चालढकल करण्यात पटाईत असतात, तर असामान्य लोक लगेच सुरुवात करण्यात. सामान्य लोक आजचं काम उद्यावर कसं ढकलता येईल, नंतर करता येईल का ? याचा विचार करतात, तर असामान्य लोक उद्याचं काम आजचं कसं करता येईल याचा विचार करतात.

तुम्ही आजची कामं उद्यावर ढकलणं बंद करा आणि बघा काय चमत्कार होतो ते. उद्या 

कल करे सो आज.. आज करे सो अभी ही असामान्य लोकांची वृत्ती असते. कधीही येत नाही. त्यामुळे सामान्य लोक अर्थपूर्ण आणि प्रभावी जीवनाऐवजी सामान्य जीवनच जगत राहतात.

5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

तर मित्रांनो, जर तुम्हाला पटकन यशस्वी व्हायचं असेल तर खालील प्रश्न स्वतःला विचारा.

  • १. संपून मानवजातीवर मोठा परिणाम करू शकेल अशी कोणती गोष्ट मी करू शकतो ?
  • २. ती गोष्ट फक्त मीच का करू शकतो ?
  • ३. ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी मला आजपासूनच काय करायला पाहिजे ?
  • ४. माझ्या जीवनाचा अर्थ मला सापडला आहे का ?
  • ५. मला आयुष्यात का यशस्वी व्हायचं आहे ? आणि आता कसलाही विचार न करता सुरुवात करा. 

कधीतरी केलेली सुरुवात ही कधीही न केलेल्या सुरुवातीपेक्षा कायम चांगलीच नाही का? 

आणखी वाचा

📤हा लेख शेअर करा

संबंधित लेख (Related Articles)

उद्योजकता विशेष: घरगुती मसाल्यांच्या व्यवसायातून गृहिणीने उभी केली कोट्यवधींची उलाढाल
बिझनेस स्टोरीज

उद्योजकता विशेष: घरगुती मसाल्यांच्या व्यवसायातून गृहिणीने उभी केली कोट्यवधींची उलाढाल

१ जुलै २०२६१ मि.
वाचा
व्यवसाय आयडिया: कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे ५ उत्तम ग्रामीण उद्योग
बिझनेस टिप्स

व्यवसाय आयडिया: कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे ५ उत्तम ग्रामीण उद्योग

३० जून २०२६१ मि.
वाचा
महिला उद्योजकता: 'स्वयंसहाय्यता बचत गटां'च्या माध्यमातून महिलांनी बनवलेले प्रॉडक्ट्स आता ई-कॉमर्सवर
बिझनेस न्यूज

महिला उद्योजकता: 'स्वयंसहाय्यता बचत गटां'च्या माध्यमातून महिलांनी बनवलेले प्रॉडक्ट्स आता ई-कॉमर्सवर

३० जून २०२६१ मि.
वाचा
यशस्वी उद्योजक: अपयशावर मात करत उभी केली स्वतःची फूड फ्रँचायझी साखळी
बिझनेस महारथी

यशस्वी उद्योजक: अपयशावर मात करत उभी केली स्वतःची फूड फ्रँचायझी साखळी

३० जून २०२६१ मि.
वाचा