तुमच्या आर्थिक साक्षरतेच्या दिशेने हे तुमचे पहिले पाऊल आहे. यामुळे आपण नक्की कुठे खर्च करतो याचा मागोवा घेता येतो.
जितके पैसे वाचवाल, तितके पैसे कमवाल अशी म्हण आहे. त्यामुळे लहान वयात पैसे वाचवण्याची सवय लावणे केव्हाही चांगले.
तुमच्याकडे नेहमी आरोग्य विमा आणि पुरेसे जीवन विमा संरक्षण असले पाहिजे. यामुळे तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकेल.
अनेकदा आणीबाणीची परिस्थिती येते. आर्थिक संकट उभे राहते. त्यासाठी इमर्जन्सी फंड तुम्हाला तुमचे अनपेक्षित खर्च भरण्यास मदत करेल.
विमा आणि इमर्जन्सी फंडनंतर गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वाढत्या महागाईवर मात करण्यास आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास यामुळे मदत होईल.
भारतात याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. आजपासूनच रिटायरमेंट नंतरचं नियोजन सुरु केलं पाहिजे. जेणेकरून आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकाल.
चांगले कर नियोजन तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय लवकर साध्य करण्यासाठी मदत करू शकते, त्यामुळे ते गांभीर्याने घ्या.