ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदाबाबत थोडीफार का होईना माहिती असली पहिजे.
1) मुलाखतीच्या ठिकाणी वेळेच्या आधी १५ मिनिटे पोहोचावे.
2) मुलाखतीच्या वेळी केबिनमध्ये शिरताना घाईघाईने आत शिरू नका, संयम आणि तोल सांभाळून आत शिरावे. आतमध्ये आल्यास सर्वप्रथम पॅनलमधील सर्व सदस्यांना अभिवादन करावे.
3) आपण ज्यावेळी मुलाखतीला जातो त्यावेळी समोर बसलेल्या व्यक्तींना पाहुन आपला गोंधळ होतो. पण त्याचवेळी आपल्या गुणांची चाचपणी होत असते, त्यासाठी गोंधळ होण्याचे टाळावे. तसेच घाईघाईने बोलणे टाळावे.
4) सूचना मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये.
5) उमेदवाराचे उत्तर व्यवस्थित, मुद्देसूद आणि आकर्षक असावे. अधिक माहिती देण्याच्या अर्विभावत जाऊ नये.
6) उमेदवाराने नेहमी समोरच्याला सर किंवा मॅडम अशा आदरयुक्त शब्दाने हाक मारावी.7) मुलाखत चालू असताना खोकला किंवा शिंक आल्यास तोंडासमोर रुमाल ठेवावा.
8) मुलाखत घेणारा हास्यविनोद करीत असल्यास उमेदवाराने सहभागी होऊ नये.9) मुलाखत देताना अधिकाधिक ज्ञान, क्षमता, कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करावा.
10) समोर बसलेल्या उमेदवाराने नेहमी समोर बसलेल्या मुख्य माणसाला उत्तर द्यावे.11) कुणीही काहीही बोललं तरी नारजी व्यक्त करू नये.
12) आपल्याला जी योग्य भाषा येते तीच बोलावी.13) उत्तर नेहमी खंबीर आणि स्पष्टपणे द्यावे.
14) मुलाखत घेणाऱ्याचा थोडाफार स्वभाव ओळखता आला पाहिजे.
16) महत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रामाणिक राहावे
17) वेगळ्या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांनी विचलित होऊ नका.18) स्पष्ट व मुद्देसूद उत्तरे द्यावीत. जेणेकरून समोरच्या व्यक्तींचा गोंधळ उडणार नाही.19) मुलाखत घेणार्यांच्या नजरेला नजर मिळवून बोलावे. अधूनमधून स्मित हास्य करायला विसरू नये.
20) मुलाखतीचा अगोदर सराव करावा.21) यशस्वी व जिंकण्याची मनोवृत्ती ठेवावी.22) तुम्हाला सूचना मिळेपर्यंत मुलाखतीचा कक्ष सोडू नये.
23) जाताना आभार मानायला विसरू नका आणि एकदा जाण्यासाठी निघाल्यानंतर मागे वळून पाहू नका.या टिप्स तुम्हाला मुलाखतीमध्ये यश मिळवून देण्यास नक्की उपयोगी ठरतील.सो ऑल द बेस्ट!