या सरकारी योजनांचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी होऊ शकता. त्या योजना कोणत्या...?
2016 पासून चालू झालेल्या या Startup India योजनेच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक भांडवल तसेच मार्गदर्शन दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून नव्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेतून देशातील SC/ST, मागास वर्गातील महिलांना 10 लाखांपासून ते 1 कोटी रुपये पर्यत लोन देऊ केले जाते.
या योजनेच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात 50 लाखापर्यंत सीडफंड दिला जातो.
या योजनेच्या माध्यमातून DPIIT च्या द्वारे स्टार्टअपच्या कक्षेत येणाऱ्या कंपन्यांना 10 कोटीपर्यंत लोन देऊ केले जाते. तसेच बँका, NBFC आणि व्हेचर डेट फंड्सच्या रुपात सेबी संलग्न संस्थांच्या माध्यमातून हा पतपुरवठा होतो.