सावधान ! दिवस कामाचे 8 तास ठरू शकतात तुमच्यासाठी घातदायक ...

होय खरंच ! 8 तास काम करणे हे तुमच्या कार्यक्षमतेसाठी नुकसानकारक ठरत आहे .

तर चला मग जाणून घेऊ . 8 तास कामाचा तुमच्या शरीरावर आणि कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो .

50 मिनटे एकाग्र चित्ताने केलेल्या कामानंतर कार्यक्षमतेमध्ये घट होण्यास सुरुवात होते .

तसेच जर तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करत असाल तर तुमची कार्यक्षमता जवळपास 40% नी कमी होते .

जास्त तास काम केल्यामुळे चुका होतात आणि कामाची गुणवत्ता खालावते व अतिरीक्त ताण , चिंता यांच ओझं डोक्यावर येते .

दिर्घकालीन तणावामुळे झोप कमी होते , रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार उद्‌भवतात 

तर याउलट Fractl च्या अभ्यासानुसार 8 तासांपेक्षा कमी कामामुळे 75% कामगारांना अधिक ताकदवान आणि अधिक उत्साही वाटते

तणाव कमी झाल्याने कामगारांचे आरोग्य सुधारेल आणि मनोबल वाढेल .

कामगारांची कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढेल परिणामी कामगारांची जीवनशैली सुधारेल आणि ते अधिक आनंदी बनतील .