मारवाड्यांच्या या 7 सवयी घडवतात यशस्वी उद्योजक, तुम्हीही जाणून घ्या

बिर्ला, बजाज, जिंदाल, गोयंका कुटुंबाची गणना देशातील यशस्वी उद्योजकांमध्ये केली जाते. मारवाडी व्यावसायिक वृत्ती आणि पद्धतीसाठी ओळखले जातात. 

बिझनेस म्हटले की तोट्याचा धंदा असा समाज मराठी माणसाने करुन ठेवला असताना मारवाडी कुटुंब मात्र त्याच व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमवताना दिसून येतात. तेव्हा आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मारवाड्यांच्या 7 सवयी ज्या त्यांना बनवतात यशस्वी उद्योजक.

पैशांवर बारीक नजर

1

1) मारवाडी बिझनेस आणि गुंतवणुकीवर बारीक नजर ठेवतात. 2) शॉर्ट टर्म ऐवजी लॉंग टर्म प्रॉफिटवर त्यांचा भर असतो. कोणत्या बिझनेसमधून किती नफा मिळतोय याकडेही त्यांचे लक्ष असते. 3) कुमार मंगलम बिर्ला आणि हर्ष गोयंका फायनान्स स्ट्रॅटेजी आणि मॅनेजमेंटसाठी ओळखले जातात.

काम सोपविल्यानंतरही कर्मचाऱ्यांवर ठेवतात नजर

2

1) कर्मचाऱ्यांना काम सोपविल्यानंतरही मारवाडी उद्योजक त्यावर नजर ठेवतात. कर्मचारी करत असलेल्या कामात कधी हस्तक्षेप करायचा आहे याची त्यांना पुरेपुर माहिती असते. 2) खुश नसलेल्या कर्मचाऱ्याला सुधारण्याऐवजी रिप्लेस करण्याकडे मारवाडी उद्योजकांचा कल असतो. 3) व्यवसायात असलेले कुटुंबातील सदस्यही योग्य परफॉर्म करीत नसेल तर त्यांनाही रिप्लेस करण्यात मारवाडी मागेपुढे बघत नाहीत.

मारवाडी सिस्टिमप्रमाणे काम केले जाते

3

1) मारवाड्यांच्या व्यवसायात एक सिस्टिम फॉलो केली जाते. त्यात जराही चाल-ढकल दिसत नाही. 2) प्रत्येक कर्मचाऱ्याला ही सिस्टिम माहिती असते. त्यात ते बदल होऊ देत नाहीत.

व्यवसायवृद्धीवर असतो भर

4

1) मारवाडी कधीही समाधानी नसतात. व्यवसायात वाढ होत राहावी यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी टार्गेट ओरिऐंटेड काम केले जाते. 2) व्यवसायातून सारखेच रिटर्न येत असेल तर त्यात बदल करण्याकडेही लक्ष दिले जाते. रिटर्न चढते असावे असे त्यांना वाटते.

कॉर्पोरेट कल्चरच्या लॉयल्टीवर असतो फोकस

5

1) कर्मचारी कंपनीसाठी लॉयल राहावेत अशा पॉलिसिज डिझाईन केल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची इफिशिअन्सी वाढते. 2) चांगले परफॉर्म करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फायनान्शिअल इन्सेटिव्ह दिले जातात. त्यामुळे चांगली काम करण्याची स्पर्धा तयार होते.

घडामोडींवर ठेवतात नजर

6

1) घडामोडींवर मारवाडी बारीक नजर ठेवतात. बिर्ला कुटुंब आता ई-कॉमर्स क्षेत्रात आले आहे. 2) एखादा व्यवसाय अयशस्वी झाला तर नाउमेद होत नाहीत. पुन्हा नव्याने सुरवात करतात

स्वतःच्या अनुभवावर निर्णय घेतात

7

1) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्णय घेत नाही. स्वतःचे अनुभव तपासून बघतात. 2) सद्यस्थितीत कोणता निर्णय योग्य आणि अयोग्य होता याचाही ते अभ्यास करतात. 3) चांगले परफॉर्म न करणाऱ्या मॅनेजमेंटला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी देत नाहीत