नवीन व्यवसाय सुरू केल्यावर आपल्याला अनेक प्रश्न पडतात. व्यवसाय चालेल का? उत्पन्न वाढेल का? नफा किती मिळेल? बाजारात आपण टिकून राहू का? पैशाची चणचण भासेल का? असे असंख्य प्रश्न
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो. काही लोक आपल्यावर अवलंबून असतात आणि त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागते. अशा स्थितीत आपले संपूर्ण लक्ष हे कामावर आणि निश्चित केलेल्या ध्येयावर असेल पाहिजे.
यश मिळवण्यासाठी आपल्याला भीती तर दूर करावी लागेलच. त्याचबरोबर जोखीमही उचलावी लागेल. जोखीम घेतल्याशिवाय कोणताच व्यवसाय सुरू होऊ शकत नाही आणि यशस्वी होऊ शकत नाही.
उद्योजकाचे यश हे त्याच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असते. कामांचा आराखडा आणि दृष्टीकोन हे व्यवसायाची पायाभरणी करत असतात. याशिवाय उद्योजक पुढे जावू शकत नाही. अशा स्थितीत कल्पनाशक्ती गमावण्याची भीती वाटणे साहजिकच आहे. या भितीला दूर करण्यासाठी आपण स्वतःला नव-नवीन कल्पनांच्या शोधात गुंतवणे गरजेचे आहे.
: एका उद्योजकाने व्यवसायात बचत केलेल्या पैशाचीही गुंतवणूक केलेली असते. अशास्थितीत आपल्याला आर्थिक अडचणीची भिती सतत सतावत असते. जर आपला आपल्या कार्यशैलीवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास असेल तर आपण पैशापेक्षा धोरणाचा पाठलाग करायला हवा. जर अशीच धाडसी वृत्ती मनात बाळगली तर व्यवसायादरम्यान आपल्याला कधीही आर्थिक अडचण येणार नाही.
जगात एकच गोष्ट अशी आहे की, ती आपल्याला यशस्वी होऊ देत नाही आणि ती म्हणजे अपयशाची भीती. अपयश किंवा पराभव हा कोणालाच नको असतो. लक्षात घ्या, जेव्हा आपण अयशस्वी होतो, तेव्हा ते अपयश आपल्याला पचवावे लागते. सर्व उद्योजकांना असा अनुभव येतोच. परंतु अशा काळातही उणिवा दूर करून यशावर मात करून मार्ग काढणारा उद्योजक यशस्वी होतो. त्यामुळे अपयशाच्या भितीकडे लक्ष न देता यशावर लक्ष देणे गरजेचे आहे.