जगातली कुठलीही अवघडातली अवघड गोष्ट तुम्ही मला सांगा, ती मी खात्रीनं करीन, पण भाषण करायला मात्र तुम्ही मला सांगू नका.. ते काही आपल्याला जमत नाही
भाषणाचं थोडं प्लॅनिंग करा, म्हणजे किती वेळ बोलायचं आहे, आॅडियन्स कोणता आहे? आॅफिसमध्ये बोलायचंय, कोणाचा सेन्डॉफ आहे किंवा गल्लीतल्या गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात थोडं बोलायचं आहे?
भाषणाची अगदी थोडी तयारी केली, तरी तुम्ही सहजपणे वेळ निभावून नेऊ शकाल. त्यासाठी अगदी शब्द न् शब्द पाठ करायची गरज नसते. तसं कधीच करूही नका. मुद्दे तेवढे लक्षात ठेवा. तुमचं ९० टक्के काम झालं म्हणून समजा.
थोडा सराव करा. आरशासमोर उभं राहून बोला. वाटल्यास आपलंच बोलणं रेकॉर्ड करा, त्याचा मोबाइलवर व्हीडीओ काढा. खूप गोष्टी तुमच्या लक्षात येतील.
सादरीकरणाकडे थोडं लक्ष द्या. भाषणात थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या समोरच्या आॅडियन्सला आपला मुद्दा कसा पटवता येईल याचा थोडा विचार करा.
आपल्याला कोणत्या ठिकाणी बोलायचं आहे, फक्त वाचून दाखवायचंय कि एखादा रिपोर्ट सादर करायचाय कि भाषण.. यावरुन त्याची पद्धत बदलेल. भाषण करताना काही अपिलिंग उदाहरणं, मध्येच थोडी विनोदाची पेरणी, आपली बॉडी लॅँग्वेज याकडे लक्ष दिलं तर आपलं भाषण नक्कीच बहारदार होईल.
ज्या श्रोत्यांसमोर आपण बोलणार आहोत, त्यांना जर संभाषणात सहभागी करुन घेता आलं तर आपलं भाषण एकसुरी होणार नाही. त्यासाठी त्यांचा मूड पाहाणं, मध्येच काही सोपे प्रश्न विचारणं.. अशा क्लृप्त्या करता येतील.
पण अशावेळी डगमगून जायचं काहीच कारण नाही. प्रत्येक गोष्ट प्रयत्नसाध्य असते आणि भाषणही त्याला अपवाद नाही. सहा ‘पी’ म्हणजे ‘पी’वरुन सुरू होणाºया या सहा गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा.. त्याप्रमाणे थोडी प्रॅक्टिस करा.. तुमच्यातलं भाषणाचं भय आणि बागुलबुवा नक्कीच निघून जाईल.