निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही!

सुविचार 

By Dr. Lora Poppins

यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे, जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात, तर यश तुमचेच आहे.

तुमच्या मध्ये मोठी कामं करण्याची क्षमता असताना सरासरीच्या कामात समाधान अजिबात मानू नका.

Top शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्यांना यश मिळत नाही. उर्जा कायम ठेवा. कामाची भूक ठेवा. कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका.

दुबळा माणूस नशीब आणि परिस्थितीवर विश्वास ठेवतो. सामर्थ्यवान माणूस मेहनत आणि परिणामांवर विश्वास ठेवतो.Runner

काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करून फेल होणं कधीही चांगलं...

पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.

जादूची कांडी फिरवली आणि स्वप्न पूर्ण झालं असं कधीच होत नाही. कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते, स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो.