स्टीव्ह जॉब्स ते बिल गेट्स, या 8 अब्जाधीशांनी घेतली नाही कोणतीही कॉलेज डिग्री

मार्क झुकेरबर्ग (फेसबुक)

मार्क झुकरबर्ग यांनी हार्वर्डमध्ये वयाच्या 20 व्या शिक्षण अर्ध्यात सोडून 'फेसबुक' हे जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क बनवले.

स्टीव्ह जॉब्स (Apple)

19 व्या वर्षी स्टीव्ह जॉब्स यांनी कॉलेज शिक्षण अर्ध्यात सोडले. ऍपलची स्थापना केली. कॅन्सर सारखा आजार देखील जॉब्स यांच्या यशाचा मार्ग रोखू शकला नाही.

बिल गेट्स (मायक्रोसॉफ्ट)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी 20 व्या वर्षी आपले शिक्षण सोडले. मायक्रोसॉफ्ट कंपनी उभारुन जगाला विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम दिली.

मायकल डेल (डेल कॉम्प्यूटर्स)

मायकल डेल यांनी वयाच्या 19 व्या वर्षी सोडले. डेल या कंपनीच्या माध्यमातून जगाला कॉम्प्युटर्स, लॅपटॉप दिले.

इवान विल्यम्स (ट्विटर)

कदाचित तुम्हाला माहीत नसेल, 'ट्विटर' सुरु करण्‍यासाठी इवान विल्यम्स यांनी वयाच्या 20 व्या वर्षी शिक्षण सोडले. नंतर त्यांना शिक्षण पूर्णही करता आले नाही.

ट्रॅव्हिस कालानिक (उबर)

उबरचे संस्थापक ट्रॅव्हिस यांनी वयाच्या 20 व्या वर्षी सोडले कॉलेज. उबर कॅब सेवा जगभरात अग्रेसर आहे.

लॅरी एलिसन (ओरॅकल)

लॅरी एलिसन यांनी वयाच्या 20 वर्षी शिक्षण अर्ध्यात सोडून ओरॅकल कंपनी स्थापन केली. सॉफ्टवेअर क्षेत्रात ओरॅकल ही खूप मोठी कंपनी आहे.

जॅन कोऊम (WhatsApp)

व्हॉट्सअॅपचे संस्थापक कोऊम यांनी वयाच्या 21 व्या वर्षी कॉलेज सोडले होते. व्हॉट्‍सअॅप हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे.