नियमितपणे पाणी न पिल्याने तोंड कोरडे पडणे, डीहायड्रेशन असे आजार उद्भवतात. डीहायड्रेशनमुळे एकाग्रता, आळशीपणा, थकवा, डोकेदुखी, वजन वाढणे, किडनीच्या समस्या, आतड्यांसबधी समस्या, चिडचिडपणा अशा अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
कोणतीही ही गोष्ट जितकी चांगली आहे तितकीच ती धोकादायक सुद्धा आहे. लोकांशी प्रत्यक्षात बोलण्याऐवजी आपण मोबईवर चॅट करण्यात जास्त वेळ घालवतो. पण येणाऱ्या या नव्या वर्षात आपण सर्व लोकांशी संपर्क करण्याचा, त्यांना प्रत्यक्षात भेटूण्याचा संकल्प करा. सोशल मीडियाऐवजी थेट लोकांशी संपर्क करा. या गोष्टी तुम्हाला मानसिक आणि शारिारीकदृष्ट्या आनंदी ठेवतील.
कोणीतरी तुमच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे असे समजून स्वत:ला कमी समजणे येत्या वर्षापासून बंद करा. आपण नेहमी स्वत:ची तुलना इतरांशी करत असतो. इतर लोकांचा विचार करून आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल करत असतो. जीवन जगताना तुलनेच्या स्पर्धेत इतके व्यस्त होऊन जातो की आपले अस्तित्वच गमावतो.
भारतातच नव्हे, तर जगभरात माणूस निसर्गापासून तुटला आहे. निसर्ग तर मानवाला भरभरून दान देत आहे. पण, माणूसच भौतिक सुखांसाठी निसर्गाचीच गळचेपी करू लागला आहे. केवळ आनंदी राहण्यासाठीच नव्हे, तर दीर्घायुषासाठी निसर्गाच्या जास्तीत जास्त सानिध्यात जाण्याचा यंदा संकल्प करा.
तुम्ही जसे आहात तसेच बेस्ट आहात. तुम्ही जे करु शकता ते कोणालाही करता येणार नाही असा विचार करा. तुमचे ध्येय निश्चित करुन आयुष्यात तुम्हाला साध्य काय करायचे आहे ते अगोदर ठरवा आणि मग त्या दिशेने वाटचाल करा.