यांना त्यांचा एमबीए अभ्यासक्रम अर्धवट सोडवा लागला होता. पण ते कठोर परिश्रम घेत राहिले, म्हणून आज ते रिलायन्स डिजिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर बनले आहेत. फोर्ब्स मॅगझीननुसार भारतातील आणि जगातील सुद्धा सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश आहे.
भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे सर्वात प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक असले तरीही, तरी त्यांना कॉलेजला जात आलं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. ते लढत राहिले आणि आज त्यांची ख्याती सर्वश्रुत आहे.
क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला आपला लाडका सचिन तेंडुलकर फक्त १०वी पर्यंत शिकलेला आहे हे वाचुन आश्चर्यचकित होऊ नका. कारण सचिनच्या क्रिकेटमध्ये असणार्या विलक्षण कौशल्यामुळे तो लहान वयातच पुर्णवेळ क्रिकेटकडे वळला. फिल्डवर त्याचे विलक्षण कौशल्य खूप आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिक्षणाचा बाऊ न करता सचिन मास्टर ब्लास्टर बनला आणि आज त्याची ख्याती संपुर्ण विश्वभर आहे.
विप्रो या नावाजलेल्या आयटी कंपनीचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी हे कॉलेजमध्ये असताना ड्रॉप झाले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी विप्रो या कंपनीची स्थापना केली.त्यांनी मिळालेले यश आणि त्यांनी केलेली धडपड वाखण्याजोगी आहे
बॉलिवुड क्षेत्रातील सर्वात जास्त प्रशंसनीय अभिनेत्यांपैकी एक असणारा अमीर खान अजुन एक उदाहरण आहे की,ज्याने कॉलेजमध्ये असतानाच ठरवले की,कॉलेज हे आपल्यासाठी नाहीये.त्याने आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले व नंतर त्याने आपल्या आवडत्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवुन एक यशस्वी अभिनेता बनुन दाखवले.
भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कॉमने आपले शिक्षण शाळेत असतानाच सोडले होते.त्यानंतर तिने भारताची अव्वल बॉक्सर बनुन बॉक्सिंगमध्ये आपले करियर नावारूपाला आणले.तिने अलीकडेच आपले शिक्षण पुर्ण केले आहे.तिच्या प्रेरणादायी जीवनावर काही दिवसांपुर्वी चित्रपट देखील आला होता.त्यात प्रियंकाने मेरीचा रोल केला होता.
वाणिज्य शाखेतुन डिग्रीचे शिक्षण घेत असतानाच गौतम अदानी यांनी आपले शिक्षण सोडले.त्यानंतर ते व्यवसायाकडे वळले.त्यांनी स्वतःची अदानी समुह नावाने हिर्यांची ब्रोकरेज कंपनी चालु केली.आज त्यांच्या कंपनीची उलाढाल जवळपास काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे.
मुंबईमधुन आपले शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर ऐश्वर्या रायने आर्किटेक्टर कोर्सला प्रवेश घेतला.पण ती कॉलेजमधुन ड्रॉपआऊट झाली.ऐश्वर्या त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली व मिस वर्ल्ड हा किताब जिंकुन तिने आपल्या नावाची छाप पाडली.बॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाने तिने वेगळा ठसा उमटवला.
आपल्या एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमुळे सलमानने बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव घट्ट केलेले आहे.पण सलमानने फक्त शाळेपर्यंतचे शिक्षण पुर्ण केलेले आहे.सलमान आणि त्यांच्या भावांनी शालेय शिक्षणानंतर त्यांच्या आवडत्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.
बॉलिवुडचा खिलाडी अशी ओळख असलेला अक्षय कुमारने मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे.त्याच्या अभिनय कौशल्यामुळे तो खुप कमी शिकलेला आहे.हे कदापि वाटणार नाही.पण अक्षयने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण होण्याआधीच कॉलेजला रामराम ठोकला.