पैसे झाडाला लागत नाहीत, पण या ५ पद्धतीने नक्की वाढवता येतात

आपण अनेकदा अतिशय कष्ट करुन एक-एक रुपया कमावलेला असतो. पण त्याचवेळी आपण पाहतो की श्रीमंत अधिक श्रीमंत बनत आहेत. त्यावेळी आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की असे कोणते काम हे श्रीमंत करतात की ज्यामुळे ते अधिक श्रीमंत होत आहेत.

याला कारण असते ते म्हणजे पैशाबद्दल तुमचा असलेला दृष्टीकोन. अनेकदा आपण पाहतो की लोकं पैसे आल्यावर लगेच प्रॉपर्टी, मोबाईल किंवा चैनीच्या गोष्टीवर खर्च करतात. तर श्रीमंतांचा दृष्टीकोन याच पैशातून अधिक पैसा कसा निर्माण करता येईल असा असतो. यामुळेच ते अधिक श्रीमंत बनतात.

१) खर्चासाठी नव्हे तर गुंतवणुकीसाठी असतात पैसे

श्रीमंत लोक पैसा खर्च करण्यापेक्षा ते गुंतवणूक करण्यास अधिक प्राधान्य देतात. हे लोक पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात, ज्याजोगे त्यांचा पैसा वाढेल. याउलट सामान्य लोक लक्झरी वस्तू विकत घेण्यासाठी पैसे खर्च करतात. यातून त्यांना काहीच उत्पन्न मिळत नाही.

२) कधीही घाई करु नका

श्रीमंत लोक पैसे गुंतवताना घाई करत नाहीत. अशी अनेक उदाहरणे आहेत की जेव्हा एखाद्या श्रीमंता व्यक्तीने सगळा बिझनेसच विकला. त्यांनी घाईत पैसे खर्च केले नाहीत, तर योग्य वेळेची वाट पाहिली आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करुन यशस्वी झाले.

३) रिस्क घेतात

श्रीमंत लोक आपले पैसे अशा ठिकाणी लावतात जेथे त्यांना चांगला नफा मिळेल. अशा बिझनेस आयडियात पैसे लावतात जेथे त्यांना स्कोप दिसतो. अनेकदा ते अशा व्यवसायायतही पैसा लावतात जिथे त्यांचा पैसा बुडू शकतो, पण फायदा झाला तर तो अनेक पटीत असतो.

४) अनेक ठिकाणी करतात गुंतवणूक

श्रीमंत लोक एका ठिकाणी पैसे लावत नाहीत. ते वेगवेगळ्या ठिकाणी पैसे लावतात. गुंतवणुकीचे नवीन मार्ग ते शोधतात.

५) खास पध्दतीच्या मालमत्तेत गुंतवणूक

श्रीमंत लोक आपला पैसा कमर्शियल प्रॉपर्टीत लावतात. दीर्घकाळात त्यांना यावर चांगला परतावा मिळतो. ते जगभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करतात. याचा त्यांना चांगला फायदा होतो. तुम्हाला असे अनेक जण भेटतील जे अशा पध्दतीने चांगला नफा कमावतात.